शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ग्रह-नक्षत्रे
Written By

संतानप्राप्ती होण्याचे काही श्रेष्ठ योग

ज्योतिषशास्त्रानुसार पाचव्या स्थानावर संततीसुख अवलंबून असते. या स्थानात जर शुभ ग्रह विराजमान असतील तर मूल होण्यात अडचणी येतात, परंतु जर शुभ ग्रहांची दृष्टी या स्थानावर असेल तर चांगली संतती प्राप्त होते.
 
* आधार लग्नाच्या तिसऱ्या स्थानात विराजमान राशीमध्ये पाचव्या किंवा नवव्या स्थानी जेव्हा गोचर सूर्य येतो त्यावेळी संतानप्राप्ती होते. 
* बृहस्पतीपासून पाचव्या स्थानाचा स्वामी ज्या राशीमध्ये स्थित असेल त्याच्या त्रिकोण राशीमध्ये बृहस्पती येण्याने संतानप्राप्ती होते.
* लग्न, सप्तम व पंचम स्थानाचे स्वामी, गुरू किंवा पाचव्या स्थानावर दृष्टी असणारा ग्रह, पंचम स्थानात स्थित ग्रह या सर्वाची महादशा वा अंतर्दशा असताना संतानप्राप्ती होते.
* जेव्हा लग्नेचा स्वामी गोचर पाचव्या स्थानाच्या स्वामीबरोबर असेल किंवा उच्च राशींमध्ये असतील किंवा आपल्या राशीमध्ये असतील किंवा पाचव्या स्थानातील राशीत असतील तर लग्नेशाबरोबर योग करून पुत्रप्राप्ती शक्य होते.
* पंचमेश मंगळ व गुरूमध्ये स्थित असतील तर त्याच्या स्वामीच्या दशेत किंवा अंतर्दशेत पुत्रप्राप्ती होते.
* जन्म नक्षत्र व पंचम नक्षत्राचा स्पष्ट योग किंवा त्यात पाचव्या किंवा नववा स्थानावर गुरू आल्याने मनुष्याला संततीप्राप्ती होते.