शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ग्रह-नक्षत्रे
Written By

17 ऑगस्टला सूर्याचे राशी परिवर्तन, जाणून घ्या कोणत्या राशीच्या जातकांचे बदलणार भाग्य

सूर्यदेव नवग्रहांचा राजा आहे. सिंह राशीचा स्वामी आहे. अग्नितत्व प्रधान ग्रह आहे. कुंडलीत सूर्याचा प्रभाव जीवनात सन्मान, यश, उन्नती, वडिलांसोबत संबंध आणि उच्च पद इत्यादी शक्यता प्रकट करतं. सूर्याची उच्च राशी मेष व नीच राशी तूळ आहे. याचं रंग गुलाबी व रत्न माणिक्य आहे.
 
17 ऑगस्ट 2018, रोजी सूर्य 07.30 मिनिटावर सिंह राशीत गोचर भ्रमण करेल आणि 17 सप्टेंबर 2018 पर्यंत या राशीत राहील. सूर्याच्या या भ्रमणाने 12 राशींवर प्रभाव पडेल...
 
मेष- कार्य क्षेत्रात परिश्रमाचा लाभ मिळेल. सरकारकडून सन्मान मिळण्याचे योग दिसत आहे.
वृषभ- पदोन्नती योग आहे. पद व प्रतिष्ठेत वृद्धी होण्याची शक्यता आहे. भाग्य बदलणार आहे.
मिथुन- शत्रूवर्ग प्रभावहीन राहील. शौर्य वाढेल. भावंडांसाठी परिश्रम करावं लागेल.
कर्क- कुटुंबात वाद निर्माण होऊ शकतं. आर्थिक दृष्ट्या शुभ संकेत आहे. धनाची बचत संभव आहे. करिअरमध्ये उंची गाठाल.
सिंह- व्यक्तित्व सुधारेल. आरोग्याच्या दृष्टीने वेळ उत्तम आहे. यश मिळण्याचे योग आहे.
कन्या- शत्रूंवर दबाव पडेल. कोर्टासंबंधी प्रकरणांमध्ये निर्णय आपल्या बाजूला लागेल.
तूळ- समाजात प्रतिष्ठा वाढेल. संतानच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. सर्वीकडे प्रशंसा मिळेल. इच्छित प्रगतीचे योग आहे.
वृश्चिक- आपण आपल्या खासगी जीवनात पुरेसा वेळ काढू शकणार नाही, म्हणून कौटुंबिक तक्रार असू शकते. नोकरीत इच्छित पदोन्नतीचे योग आहेत.
धनू- भाग्य वृद्धी होईल. मन प्रसन्न राहील. वडिलांच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. नशीब बलवान आहे.
मकर- वाणीवर ताबा ठेवा. अनुकूल वातावरण असू द्या. कोणत्याही प्रकाराच्या वादापासून दूर राहा. देणंघेणं सांभाळून करा.
कुंभ- जीवनसाथीदारासोबत कोणत्याही प्रकाराचे वाद टाळा. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. अचानक लाभ प्राप्ती योग आहे. भाग्य साथ देईल.
मीन- यश मिळेल. अधिक परिश्रम केल्याने उत्तम परिणाम दिसून येतील. प्रवासाचे योग बनतील.