शुक्रवार, 22 नोव्हेंबर 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ग्रह-नक्षत्रे
Written By

सर्वार्थ सिद्धी योगात मंगळ करत आहे राशिपरिवर्तन, जाणून घ्या त्याचे फायदे

ज्येष्ठ कृष्ण पक्षाच्या द्वितीय तिथीला मंगळ राशी बदलत आहे. आता पुढील 6 महिन्यांपर्यंत हे ग्रह आपली उच्च राशी मकरमध्ये राहणार आहे. आज संध्याकाळी 04:15 मिनिटाने मंगळ मकर राशीत प्रवेश करेल आणि 6 नोव्हेंबरच्या सकाळी 08:20 वाजेपर्यंत यात राशीत राहणार आहे. आज बुधवार असून सर्वार्थ सिद्धी योग देखिल आहे. हा शुभ योग काही राशींसाठी फायदेशीर असू शकतो.
 
तर जाणून घेऊ राशीनुनसार कोणत्या लोकांना याचा फायदा मिळणार आहे
 
1. मेष
मंगळाचे राशी बदलल्यामुळे तुमचे जॉब आणि बिझनेससाठी वेळ उत्तम आहे. तुम्हाला एखादी गोड बातमी मिळू शकते. बिझनेस वाढवण्याची प्लानिंग करत असाल तर तुमच्यासाठी योग्य वेळ आहे पण विवाद होण्याचे देखील योग बनत आहे. नोकरदारांना बढतीसोबतच मोठी जबाबदारी मिळू शकते.
 
2. वृषभ
मकर राशीत मंगळ आल्याने तुम्हाला भाग्याचा साथ मिळेल. जॉब आणि बिझनेसमध्ये मेहनत कराल तर त्याचा फायदा तुम्हाला नक्कीच मिळेल. भाऊ आणि मित्रांचा साथ मिळेल पण या लोकांशी वाद देखील होण्याची शक्यता आहे.
 
3. मिथुन
या राशीच्या लोकांना थोडे सावधगिरीने राहिला पाहिजे. अपघाताची शक्यता आहे. आरोग्याच्या बाबतीत देखील सावधगिरी बाळगायला पाहिजे. शत्रू तुम्हाला नुकसान पोहचवू शकतो.
 
4. कर्क
जॉब आणि बिझनेसचे मोठे काम पूर्ण होतील पण विवाद होण्याची देखील शक्यता आहे. लव्ह लाईफसाठी वेळ चांगला आहे पण दांपत्य जीवनात चढ उतार होण्याची शक्यता आहे.
 
5.सिंह
मकर राशीत मंगळ आल्याने वायफळ खर्च आणि प्रवास होण्याची शक्यता आहे. विवाद होण्याची शक्यता देखील आहे. पारिवारिक आणि वैवाहिक जीवनात असंतोष राहील.
 
6. कन्या
मकर राशीत मंगळ आल्याने तुमच्या सोबत काम करणार्‍या लोकांशी तुमचे खटके उडण्याची शक्यता आहे. अचानक मोठी योजना आखण्यात येईल ज्यामुळे येणार्‍या दिवसांमध्ये तुम्हाला फायदा होईल.
 
7. तुला
मकर राशीत मंगळ आल्याने कौटुंबिक तणाव वाढेल. कुठली ही गोष्ट बोलताना विचार करून बोला व रागावर नियंत्रण ठेवा अन्यथा तुमचे महत्त्वाचे काम बिघडण्याची शक्यता आहे. स्वत:साठी वेळ काढू शकणार नाही. रोजचे काम देखील वाढतील.
 
8. वृश्चिक
मंगळाचा मकर राशीत येणे तुमच्यासाठी उत्तम राहणार आहे. तुमचे मोठे काम पूर्ण होतील तसेच भाग्याचा साथ देखील मिळेल. मेहनत आणि धावपळीमुळे तुम्ही स्वत:च्या आरोग्याकडे दुर्लक्ष कराल. जॉब आणि बिझनेस उत्तम राहील.
 
9. धनू
मंगळाचे राशी परिवर्तन तुमच्या खर्चात वाढ करू शकतो. तुमची सेव्हिंग संपुष्टात येऊ शकते. धावपळ आणि प्रवास घडेल. संतानच्या आरोग्याबद्दल थोडे टेन्शन राहण्याची शक्यता आहे.
 
10. मकर
मंगळाची राशी बदलल्यामुळे तुमच्यावर त्याचे मिश्रित परिणाम पडतील. प्रॉपर्टीच्या प्रकरणात तुम्हाला फायदा होईल. आरोग्याबद्दल सावधगिरी बाळगावी लागणार आहे. अपघात होण्याची शक्यता आहे. वाहन चालवताना सावधगिरी बाळगा.
 
11. कुंभ
मंगळाच्या राशी परिवर्तनामुळे प्रवास, धावपळ आणि वायफळ खर्च वाढतील. जॉब आणि बिझनेस संबंधी प्रवासाचा योग आहे. अधिकारी आणि मोठ्या लोकांकडून मदत मिळू शकते. आरोग्याची काळजी घ्यावी लागणार आहे.
 
12. मीन
मंगळाचे राशी परिवर्तनामुळे तुम्हाला काही बाबतीत भाग्याचा साथ मिळेल. तुमच्या योजना पूर्ण होऊ शकतात. मित्र आणि साथीदारांकडून लाभ मिळेल. दूरस्थ जागेवरचा प्रवास होण्याची शक्यता आहे.