बुधवार, 22 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. जन्माष्टमी
Written By
Last Updated : सोमवार, 26 ऑगस्ट 2024 (08:03 IST)

दहीहंडी सण का साजरा केला जातो?

दर वर्षी जन्माष्टमी सण खूप धूमधडाक्याने साजरा केला जातो. या दरम्यान दहीहंडी कार्यक्रम हा कृष्ण जन्माष्टमी उत्सवाचा अविभाज्य भाग आहे. हे महाराष्ट्र राज्यात सर्वात प्रसिद्ध आहे. या उत्सवादरम्यान तरुण लोकांचा एक गट जमिनीच्या खूप वर लटकलेल्या दह्याने भरलेले भांडे गाठण्यासाठी आणि तोडण्यासाठी मानवी पिरॅमिड तयार करतात. या मटकीला हंडी म्हणतात.
 
भगवान कृष्ण हे लोणी आणि दही यांच्या प्रेमासाठी ओळखले जातात. तर दहीहंडीचे कार्यक्रम कृष्ण जन्माष्टमीला, भगवान श्रीकृष्णाच्या जन्मदिनी आयोजित केले जातात. 
 
दहीहंडी स्पर्धांमधील सहभागी एक मजबूत मानवी पिरॅमिड तयार करण्यासाठी एकत्र काम करतात तर गटातील एक व्यक्ती हंडीपर्यंत पोहोचण्यासाठी शिखरावर चढते. ही एक आव्हानात्मक क्रियाकलाप आहे ज्यासाठी टीमवर्क, समन्वय आणि संतुलन आवश्यक आहे. हंडी फोडणे हे भगवान श्रीकृष्णाच्या खेळकर आणि खोडकर स्वभावाचे प्रतीक आहे.
 
दहीहंडी उत्सवाचा इतिहास आणि महत्त्व
हिंदू पौराणिक कथेनुसार, कान्हा लहानपणी खूप खोडकर होता आणि त्याला लोणी, दही आणि दूध खूप आवडत असे. गोकुळात दही-लोणी साठवून ठेवले जात होते तेव्हा कृष्ण आपल्या मित्रांसह गावातील घरातील लोणी चोरण्यासाठी जात असे. कान्हाचे हात पोहचू नये म्हणून गावातील स्त्रिया लोणीचे भांडे उंचावर टांगत असत. पण बाल गोपाळ आणि त्याचे मित्र पिरॅमिड तयार करुन मडक्यातील लोणी चोरुन खायचे. कृष्णाच्या या खोडसाळपणामुळे गोकुळातील रहिवाशी आनंदी होते, कारण स्वयं भगवान श्री कृष्ण दहीहंडी फोडत असे तेव्हा घरात सुख-समृद्धी नांदत असल्याचे वातावरण असायचे. गोकुळातील लोकांना जीवनात कधीच कमरता भासली नाही. 
 
ही परंपरा कालांतराने आधुनिक काळातील दहीहंडी उत्सवात विकसित झाली. वर जाऊन मटकी फोडणार्‍यांना 'गोविंदा' म्हणतात. हा सण श्री कृष्णाच्या बालपणीच्या खोडी आणि त्यांच्या आनंदाने भरलेल्या क्रियाकलापांचे प्रतीक आहे, जे जीवन आनंद आणि उत्साह भरते.
 
दहीहंडीचे महत्त्व केवळ मजा आणि खेळ यांच्या पलीकडे आहे. हे एकता, टीमवर्क आणि सहकार्याच्या भावनेचे प्रतीक आहे, कारण सहभागी मानवी पिरॅमिड तयार करण्यासाठी एकत्र काम करतात. हे भगवान कृष्णाच्या खोडकर आणि खेळकर स्वभावाचे स्मरण म्हणून देखील कार्य करते आणि उत्सवांमध्ये आनंद आणते.