शनिवार, 1 नोव्हेंबर 2025
  1. धर्म
  2. ख्रिश्चन
  3. ख्रिश्चन धर्माविषयी
Written By
Last Modified: गुरूवार, 30 ऑक्टोबर 2025 (15:01 IST)

Halloween Party 2025 भुताटकी सण हॅलोविन म्हणजे काय? का, कधी आणि कशा प्रकारे साजरी करतात हॅलोविन पार्टी?

Halloween Party 2025 date
हॅलोवीन (Halloween) ही ३१ ऑक्टोबरच्या रात्री साजरी होणारी पाश्चात्य परंपरा आहे. "All Hallows' Eve" म्हणजे सर्व संतांच्या दिवसाच्या (१ नोव्हेंबर) आधीची रात्र. ही भूत-प्रेत, जादू-टोणा आणि कॉस्च्युमचा सण आहे, जिथे "ट्रिक-ऑर-ट्रीट" हा मुख्य खेळ असतो.
 
हॅलोविन म्हणजे काय?
या सणाची उत्पत्ती "समहेन" नावाच्या प्राचीन सेल्टिक उत्सवापासून होते, जो कापणीचा शेवट आणि हिवाळ्याच्या सुरुवातीचे प्रतीक आहे. भूत आणि आत्मे जगाला त्रास देतात असे मानले जाते. म्हणून लोक त्यांच्या पूर्वजांचा सन्मान करण्यासाठी आणि वाईट आत्म्यांना दूर ठेवण्यासाठी या दिवशी विशेष तयारी करतात. पूर्वी लोकांचा असा विश्वास होता की या रात्री मृतात्मे पृथ्वीवर परत येतात, त्यामुळे आत्म्यांपासून संरक्षणासाठी लोक मुखवटे घालत आणि दिवे लावत असत.
 
नंतर ख्रिश्चन धर्म आल्यावर १ नोव्हेंबरला "All Saints’ Day" आणि २ नोव्हेंबरला "All Souls’ Day" साजरे होऊ लागले. ३१ ऑक्टोबरची रात्र म्हणजे "All Hallows’ Eve" हळूहळू त्याचं नाव Halloween पडलं.
 
हॅलोवीन पार्टी कशी साजरी करतात?
Costume Party (वेषभूषा पार्टी): लोक विविध भयानक किंवा मजेशीर वेश परिधान करतात जसे की भूत, जादूगार, पिशाच, सुपरहिरो, कार्टून कॅरेक्टर इत्यादी. यासाठी मेकअप, मास्क, आणि खास थीम असते.
Pumpkin Carving (भोपळा कोरणे): मोठ्या भोपळ्याला कोरून त्यात डोळे, तोंड बनवले जाते आणि आत दिवा लावला जातो याला म्हणतात Jack-o’-lantern.
Trick or Treat: मुलं घराघरांत जाऊन "Trick or treat!" असं म्हणतात. त्यांना घरमालक चॉकलेट्स, कँडी, किंवा लहान गिफ्ट्स देतात.
Haunted House Decorations: घरं भुतांचे घर म्हणून सजवली जातात. कोळ्यांचे जाळे, सांगाडे, भुते, आणि दिवे.
Halloween Music & Dance Party: भयावह पण मजेदार गाणी, नृत्य आणि थीम गेम्ससह पार्टी होते.
 
हॅलोवीनमध्ये कोणते पदार्थ खास?
हॅलोवीनच्या दिवशी खास थीम-आधारित पदार्थ बनवले जातात- भोपळ्यापासून तयार केलेले पदार्थ, साखरेच्या लेपात मढवलेले सफरचंद, चॉकलेट्स, कप केक्स, कुकीज, पॉपकॉर्न बॉल्स, हॉट चॉकलेट आणि कोल्ड डिंक्र्स.
खेळ आणि उपक्रम:
Apple Bobbing:पाण्याच्या भांड्यात तरंगणारी सफरचंद तोंडाने पकडायची.
Treasure Hunt / Scavenger Hunt:भुतांचे, भोपळ्यांचे किंवा गुप्त वस्तू शोधायच्या खेळ.
Best Costume Contest:सर्वोत्तम वेषभूषा ठरवून बक्षीस दिलं जातं.
Storytelling:भुतांच्या गोष्टी सांगितल्या जातात.