मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ग्रह-नक्षत्रे
Written By

पाचू (पन्ना) रत्न - Panna Stone

ज्योतिषीय महत्वानुसार पन्ना रत्न ज्याला इंग्रजीत एमराल्ड स्टोन म्हणतात. हा फारच मूल्यवान रत्न आहे. पन्ना मूलत: हिरव्या रंगाचा असतो आणि हा हलका आणि डार्क रंगात उपलब्ध असतो. सर्वात मूल्यवान आणि प्रभावी पन्ना रत्न अमेरिकेच्या कोलंबियात दिसून येतात. खदानीतून काढल्यानंतर पन्ना रत्नाची ऑयलिंग केली जाते. पन्ना रत्न धारण केल्याने याचे सकारात्मक परिणाम दिसून येतात. याच्या प्रभावाने मानसिक विकारांमध्ये सुधारणा होते. ज्यांच्या पत्रिकेत बुध कमजोर असतो त्यांनी मानसिक आणि बौद्धिक क्षमतेत वाढ करण्यासाठी पन्ना धारण केला पाहिजे. असे देखील मानले जाते की जर गर्भवती महिलांच्या कमरेत पन्ना बांधला जातो तर प्रवस सोप्यारित्या पार पडतो. ज्या लोकांना बोलण्यात त्रास होतो किंवा बोबडे बोलतात त्यांना पन्ना धारण करण्याचा सल्ला देण्यात येतो.   
 
पन्ना रत्ना द्वारे होणारे फायदे  
पन्ना रत्नाचे बरेच लाभ आणि विशेषता आहे. जीवनात होणार्‍या बर्‍याच घटना आणि दुखांपासून बचाव करण्यासाठी पन्ना फारच फायदेशीर असतो. याच्याशी निगडित लाभ खाली देण्यात आले आहे :
 
हे चांगले आरोग्य आणि धन संबंधी बाबींसाठी उत्तम असतो आणि जीवनात आनंद कायम ठेवतो.  
पन्नामध्ये विषारी तत्वांशी लढण्याची क्षमता असते आणि याला धारण केल्याने सर्प दंशाची शक्यता कमी होऊन जाते.  
हे गर्भवती महिलांसाठी लाभकारी असत कारण याला धारण केल्याने प्रसवच्या वेळेस जास्त त्रास होत नाही.  
हा मानसिक ताण कमी करतो आणि रक्तदाब सामान्य ठेवतो.  
जर पन्ना रत्न तुम्हाला गिफ्टमध्ये देण्यात आला तर हा चांगल्या भाग्याचा कारक असतो, खास करून मिथुन आणि कन्या राशिच्या लोकांसाठी.  
ज्या लोकांना बोलण्यात त्रास होतो त्यांनी पन्ना ग्रहण केला पाहिजे. जर तुम्ही वक्ता असाल आणि पन्ना धारण कराल, तर तुमच्या भाषेत आणि वणीत उठाव येईल.
 
पन्ना रत्नाने होणारे नुकसान
पन्ना फारच मूल्यवान रत्न आहे. जर याचे सकारात्मक प्रभाव असतील तर काही नकारात्मक प्रभाव देखील असतात. यातून काही नकारात्मक प्रभाव या प्रकारे आहे :
 
जे लोक आपल्या जन्म पत्रिकेत बुधच्या विपरीत प्रभावाने पीड़ित असतील तर त्यांनी  पन्ना नाही धारण करायला पाहिजे.  
ज्या लोकांना प्रत्येक गोष्ट बढवून सांगायची आणि आणि खोटे बोलण्याची सवय  असते त्यांनी पन्ना धारण नाही करायला पाहिजे.  
जे लोक छोट्या गोष्टींना बढवून सांगतात त्यांना देखील पन्ना नाही धारण करायला पाहिजे.   
जे लोक दुसर्‍यांविरुद्ध षडयंत्र रचतात त्यांना देखील पन्ना रत्न धारण करणे टाळावे.  
ज्या लोकांना कुठल्याही प्रकारची अॅलर्जी असेल त्यांनी देखील पन्ना नाही धारण करायला पाहिजे.  
जे लोक फार बुद्धीमान असतात त्यांनी देखील पन्ना नाही धारण करायला पाहिजे कारण हा रत्न त्या लोकांसाठी असतो ज्यांचा बुध कमजोर असतो.  
 
ज्योतिषीय विश्लेषण- विभिन्न राशींवर पन्ना रत्नाचा प्रभाव  
मेष
या राशीच्या जातकांना पन्ना रत्न धारण न करण्याचा सल्ला देण्यात येतो.  
 
वृषभ
तुम्ही पन्ना घालू शकता पण याचे उत्तम परिणाम मिळवण्यासाठी याच्यासोबत हिरा किंवा पांढरा पुखराज धारण करावा.  
 
मिथुन
मिथुन राशिच्या जातकांना पन्ना धारण करण्याचा सल्ला देण्यात येतो कारण हा यांच्या राशीचा रत्न आहे. 
 
कर्क
या राशीच्या लोकांनी कधीही पन्ना धारण करू नये.  
 
सिंह
पन्ना घालणे तुमच्यासाठी फारच फायदेशीर असते.  
 
कन्या
पन्ना या राशीच्या लोकांचा जन्म राशी रत्न आहे म्हणून पन्ना धारण केल्याने तुम्हाला विविध क्षेत्रांमध्ये मदत मिळते.  
 
तुला
पन्नापासून चांगले परिणाम मिळवण्यासाठी याला हिर्‍यासोबत धारण करावे.  
 
वृश्चिक
वृश्चिक राशिच्या जातकांनी पन्ना धारण करण्याअगोदर एकदा ज्योतिषीय सल्ला घ्यावा.  
 
धनू 
या राशीचे लोक पन्ना धारण करू शकतात पण याचे उत्तम परिणामासाठी याला पुखराजसोबत घालावे.   
 
मकर
पन्ना तुम्ही कधीही धारण करू शकता.  
 
कुंभ
पन्ना धारण करण्याअगोदर ज्योतिषीय सल्ला अवश्य घ्या आणि पन्नाला विशेष परिस्थितित नीलम रत्नासोबत धारण करा.  
 
मीन
उत्तम परिणाम मिळवण्यासाठी मीन राशीच्या जातकांनी पन्ना एखाद्या इतर रत्नासोबत धारण करा, यासाठी ज्योतिषीय सल्ला अवश्य घ्या. कारण पन्ना रत्न धारण करणे तुमच्यासाठी हानिकारक ठरू शकत.