सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ग्रह-नक्षत्रे
Written By
Last Modified: गुरूवार, 17 सप्टेंबर 2020 (16:56 IST)

सूर्य राशी परिवर्तन : बुधादित्य योग कोणत्या राशींसाठी लाभदायक जाणून घ्या

सूर्यदेव 17 सप्टेंबर पासून आपल्या राशीवरून कन्या राशीत प्रवेश करत आहे. जेव्हा भगवान सूर्य कन्या राशीत संक्रमण करतात त्याला कन्या संक्रांती असे म्हणतात. याला आश्विन संक्रांतीच्या नावाने देखील ओळखतात.
 
कन्या संक्रांतीमध्ये भगवान विश्वकर्मा यांची उपासना करतात. ही संक्रांती खूप फायदेशीर असते. या संक्रांतीमध्ये देणगी देण्याचं फळ मिळतं. पितरांना देखील तर्पण दिले जाते. आपणास सांगू इच्छितो की सूर्यदेव एकाच राशीमध्ये एक महिना राहतात. सूर्य आपली राशी बदलत आहे अश्या प्रकारे बुध ग्रह जे आधी पासूनच कन्या राशीत आहे, म्हणून बुध आणि सूर्य दोन्ही ग्रह एकत्र आल्यामुळे बुधादित्य योग बनतात. हा संयोग खूप शुभ असून याचे शुभ परिणाम दिसून येतात.
 
बुधादित्य योग बनल्याने आणि सूर्य संक्रांतीचा भिन्न भिन्न राशींवर खूप सकारात्मक परिणाम दिसतो. कन्या राशी असणाऱ्यांसाठी सूर्याचे हे परिवर्तन चांगले आहे. या परिवर्तनामुळे काही राशींसाठी भाग्योदयाची स्थिती बनत आहे तर काही राशींसाठी यशाचे योग जुळून येत आहे, काही राशींसाठी आपल्या ध्येयाच्या प्राप्तीसाठी कठोर परिश्रम करावे लागणार. चला जाणून घेऊया वेग वेगळ्या राशींवर होणार्‍या प्रभावाबद्दल.
 
मेष - आपणास धन प्राप्तीचे योग आहे, या राशीच्या जातकांना समाजात मान मिळेल.
वृषभ - या राशीच्या लोकांना यश प्राप्तीसाठीच्या बऱ्याच संधी मिळतील, यासाठी कठोर परिश्रम करावे लागणार.
मिथुन - बऱ्याच काळापासूनची रखडलेली कामे पूर्ण होणार.
कर्क - आपण कॅरियरशी निगडित जे काम करू शकत नव्हता, ते करण्याचे धाडस कराल.
सिंह - आपल्याला आपल्या आई-वडिलांचा आशीर्वाद मिळेल. आपणास यश मिळविण्याच्या संधी मिळतील.
कन्या - कन्या राशीच्या जातकांसाठी हे परिवर्तन खूप चांगले आहेत, आपल्यासाठी चांगले योग जुळून येत आहे.
तूळ -आपली आर्थिक परिस्थिती चांगली होणार.
वृश्चिक - आपणास आपल्या कार्याच्या सिद्धीसाठी परिश्रम करावे लागणार.
धनू - समाजात आपणास आदर आणि सन्मान मिळेल.
मकर - या राशीच्या लोकांना जीवनात अश्या परिस्थितीला सामोरी जावे लागणार जिथे आपल्याला दृढ निर्णय घ्यावे लागणार.
कुंभ - जोडीदाराशी भांडण आणि क्लेश होण्याची स्थिती उद्भवू शकते.
मीन - या राशीच्या लोकांसाठी होणारे बदल चांगले आहेत, विशेषतः आपल्याला कार्यक्षेत्रात सकारात्मक परिणाम दिसू शकतात.