शुक्रवार, 8 ऑगस्ट 2025
  1. मराठी ज्योतिष
  2. वास्तुशास्त्र
  3. वास्तुसल्ला
Written By
Last Modified: सोमवार, 14 सप्टेंबर 2020 (12:24 IST)

काय, आपल्या घरात देखील नळातून पाणी गळतं ? तर नकारात्मक प्रभाव जाणून घ्या

Vastu tips
बऱ्याचदा आपण घरातील बऱ्याच गोष्टींपासून अनभिज्ञ असतो. पण हे आपल्या आरोग्यावर तसेच पैशांवर थेट परिणाम टाकतात. वास्तुशास्त्रात संपत्ती संचय, वैवाहिक जीवनाशी निगडित समस्या आणि प्रगतीसाठीचे बरेच उपाय सांगितले आहेत. वास्तुशास्त्रानुसार, घराच्या कोणत्याही भागात नळ गळत असल्यास ते लवकरात लवकर दुरुस्त करून घ्यावे. घरात गळणारे नळ अशुभ मानले जाते. असे म्हणतात की गळणारे नळ आर्थिक नुकसानासह आजाराचे सूचक आहेत.
 
1 वास्तुशास्त्रानुसार, जर घराच्या नळातून किंवा टाकीमधून पाणी गळत असल्यास त्वरित दुरुस्त करावं. असे मानले जाते की घरातील संपत्ती देखील पाण्याप्रमाणे वाहून जाते. कर्जाचं ओझं वाढतं आणि संपत्ती साठत नाही. 
 
2 वास्तुशास्त्रानुसार, नळातून गळणारे पाणी अशुभ मानले जाते. हे उधळपट्टीचे सूचक आहे.
 
3 असे म्हणतात की स्वयंपाकघरातील नळ खराब होणं शुभ नसतं. वास्तुशास्त्रानुसार, त्यामुळे घरातील एखादा सदस्य आजारी होऊ शकतो.
 
4 नळ गळत असल्याचे दुष्प्रभाव व्यवसायावर देखील पडतो. वास्तू शास्त्रानुसार, खराब असलेल्या नळामुळे व्यवसायात देखील त्रास संभवतात. नुकसान होण्याची शक्यता असते. 
 
5 घरातील गळणाऱ्या नळाला त्वरित दुरुस्त करावं. वास्तू शास्त्रानुसार घरातील कोणत्याही डागडुजीसाठी पैसे मोजावे लागू शकतात.
 
6 गळत असलेल्या नळामुळे घरात नकारात्मक ऊर्जा संचारते. वास्तुशास्त्रानुसार, खराब नळ असल्यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा कमी तर नकारात्मक ऊर्जा वाढते.