1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ग्रह-नक्षत्रे
Written By
Last Modified: गुरूवार, 16 मे 2024 (12:42 IST)

19 मे रोजी वृषभ राशीत शुक्राचे गोचर, या राशीच्या लोकांना देवी लक्ष्मीची कृपा असेल

Transit of Venus in Taurus on May 19
हिंदू पंचागानुसार शुक्र 19 मे रोजी वृषभ राशीत प्रवेश करेल. काही राशीच्या लोकांसाठी हे संक्रमण खूप फायदेशीर ठरेल. शुक्राचा वृषभ राशीत प्रवेश गुरू आणि शुक्राचा संयोग निर्माण करेल. या राशीच्या लोकांना 13 जूनपर्यंत हे मिश्रण लाभ देईल.
 
वृषभ- शुक्राच्या राशी बदलामुळे वृषभ राशीच्या लोकांसाठी आर्थिक लाभ होईल. गुंतवणूक आणि नोकरीतून आर्थिक लाभ होईल. उत्पन्नाचे नवीन स्रोत उघडू शकतात. वैवाहिक जीवनात शांतता राहील. प्रेमविवाहातही यश मिळू शकते. अनोळखी व्यक्तीच्या बोलण्याने प्रभावित होऊन कोणतेही चुकीचे काम करणे टाळा, अन्यथा आर्थिक नुकसान होऊ शकते.
 
कर्क- कर्क राशीच्या लोकांना शुक्र आणि गुरूच्या संयोगाचा फायदा होईल. नोकरदारांना प्रमोशन मिळू शकते. व्यावसायिकांना चांगला फायदा होऊ शकतो. अविवाहित लोकांचे विवाह निश्चित केले जाऊ शकतात. संतान प्राप्तीचे देखील योग आहे. अधिका-यांचे सहकार्य मिळू शकते.
 
वृश्चिक- वृश्चिक राशीच्या लोकांसाठी शुक्राचे संक्रमण शुभ राहील. करिअरमध्ये यश मिळेल. घरात शांततेचे वातावरण राहील. जोडीदाराशी असलेले वाद मिटतील. तब्येत सुधारेल आणि जुन्या आजारापासून मुक्ती मिळेल. काही कामानिमित्त परदेशात जाण्याची शक्यता आहे.