सोमवार, 25 नोव्हेंबर 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ग्रह-नक्षत्रे
Written By
Last Updated : मंगळवार, 14 मे 2024 (17:22 IST)

कोणत्या हाताच्या अंगठ्यात चांदीची अंगठी घालावी? चंद्र आणि शुक्र मजबूत होईल

Thumb Sliver Ring चांदीची अंगठी परिधान केल्याने केवळ आपल्या हातांचे सौंदर्यच वाढते असे नाही तर त्याचे अनेक धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व देखील आहे. चांदीची अंगठी धारण केल्याने चंद्र आणि शुक्र ग्रह मजबूत होतात. एवढेच नाही तर इतर कमकुवत ग्रहांना बळ देण्यासाठीही चांदीची अंगठी फायदेशीर मानली जाते. यामुळेच अनेक लोक चांदीच्या अंगठ्या घालतात. चांदीची अंगठी घालण्याचे अनेक फायदे आणि नियम आहेत.
 
चांदीची अंगठी धारण केल्याने फायदा होतो
आरोग्य लाभ- चांदी धारण करणे आरोग्यासाठी शुभ मानले जाते. चांदी एक थंड धातू आहे जी शरीराचे तापमान नियंत्रणात ठेवते. उन्हाळ्यात होणाऱ्या समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी चांदीची अंगठी उपयुक्त ठरू शकते. 
 
धार्मिक फायदे- अनेक धर्मांमध्ये चांदी हा सर्वात पवित्र धातू मानला जातो. हिंदू धर्मात देवी मातेला प्रसन्न करण्यासाठी आणि कामात आत्मविश्वास वाढवण्यासाठी चांदीची अंगठी घालणे फायदेशीर मानले जाते.
 
ज्योतिषीय फायदे - ज्योतिषशास्त्रातही ग्रहांच्या बळावर चांदी फायदेशीर मानली जाते. चंद्र आणि शुक्रासाठी चांदीची अंगठी फायदेशीर मानली जाते. चांदी धारण केल्याने मन शांत राहते. चंद्राच्या शुभ प्रभावामुळे मनाचा कारक, व्यक्तीमध्ये एकाग्रता वाढते. यासोबतच ग्रहांच्या नकारात्मक ऊर्जेपासूनही मुक्ती मिळते. चांदीची अंगठी धारण करणे धनवृद्धीसाठी आणि कामात प्रगतीसाठी शुभ असते.
 
कोणत्या हाताच्या अंगठ्यावर चांदीची अंगठी घालावी?
ज्योतिष शास्त्रानुसार महिलांनी डाव्या हाताच्या अंगठ्यामध्ये चांदीची अंगठी घालावी. तर पुरुषांनी उजव्या हाताच्या अंगठ्यामध्ये चांदीची अंगठी घालावी. असे मानले जाते की यामुळे सूर्य आणि शनि हे दोन्ही ग्रह बलवान होतात. यासोबतच नशिबात वाढ, रागावर नियंत्रण, कामात एकाग्रता आणि आत्मविश्वास वाढतो. मधल्या बोटात चांदीची अंगठी घालणे देखील शुभ मानले जाते. मात्र चांदीची अंगठीत जोड नसावा.
 
कोणत्या राशींसाठी चांदीची अंगठी घालणे शुभ?
कर्क, वृश्चिक, वृषभ, तूळ, मीन या राशींच्या जातकांसाठी चांदीची अंगठी घालणे शुभ मानले जाते.
 
कोणत्या दिवशी चांदीची अंगठी घातली पाहिजे?
हिंदू धर्माच्या शास्त्रानुसार चांदीची अंगठी घालण्यासाठी सोमवार आणि शुक्रवार हे शुभ दिवस आहेत. तुम्ही दोन दिवसांपैकी कोणत्याही दिवशी चांदीची अंगठी घालू शकता. फक्त एक रात्री आधी देवघरात दुधाच्या भांड्यात चांदीची अंगठी ठेवावी लागते. उदाहरणार्थ जर तुम्हाला सोमवारी चांदीची अंगठी घालायची असेल, तर आदल्या रात्री म्हणजे रविवारी रात्री एका भांड्यात दूध घाला, त्यात चांदीची अंगठी घाला आणि ती मंदिरात ठेवा. दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणजे सोमवारी स्नान वगैरे करून गंगाजलाने स्वच्छ करून ते परिधान करावे.
 
अस्वीकरण: येथे दिलेली माहिती ज्योतिषशास्त्र आणि धार्मिक विश्वासांवर आधारित आहे. हे फक्त माहितीसाठी तुमच्यासोबत शेअर केले आहे. वेबदुनिया याला दुजोरा देत नाही.