शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ग्रह-नक्षत्रे
Written By
Last Modified: मंगळवार, 10 जानेवारी 2023 (10:59 IST)

यशस्वी विवाहासाठी टिप्स

marriage
जर तुमच्या संबंधात सतत भांडणं होत असतील तर वेळीच सावध व्हा. तुमच्या पत्रिका न जुळण्याची शक्यता जास्त आहे.
 
जर दोघांपैकी एकाला मंगळ असेल तर पत्रिका पाहून घ्या. ते अशुभ ठरू शकते. तरीही जर तुम्हाला लग्न करायचेच असेल तर लग्नाआधी मंगळ दोषावर उपाय करून घ्या. यामध्ये कुंभविवाह व वटविवाह हे दोन मुख्य उपचार मानले जातात.
 
संख्याशास्त्रानुसार तुम्ही दोघे मित्रसंख्या आहात का याचा विचार आधीच करून घ्या. उदा.
४-९, १-८, २-३, २-५ आदी संख्यांचे मीलन शुभ नाही.
 
प्रेमविवाह सफल होण्यासाठी प्राणप्रतिष्ठा केलेला अस्सल नेपाळी गौरी शंकर रुद्राक्ष पांढऱ्या सोन्यात जडून धारण करा.
 
ओपल किंवा हिरा वापरल्याने प्रेमविवाहात यश मिळते.
 
सप्तमेश किंवा सप्तम स्थानात विराजमान असलेल्या ग्रहांची शांती करून घ्या.
 
प्रेमसंबंधांबद्दल निर्थक चर्चा करू नका. तसेच ऊठसूठ कोणाशीही त्यातील नाजुक बाबींबद्दल चर्चा करू नका. दुष्परिणाम होतील.
 
एकमेकांना टोकदार किंवा धारदार वस्तू भेट देऊ नका. संबंध खराब होतील.
 
काळ्या रंगाच्या वस्तू देऊ नका.
 
लाल, गुलाबी व सोनसळी रंगाच्या वस्तू शुभ असतात.
 
हिरा भेट देणे शुभ आहे.
 
पांढरे वस्त्र धारण करून कोणत्याही धर्मस्थळामध्ये जा. तेथे लाल गुलाब व चमेलीची फुले अर्पण करण्याने  विवाहासाठी लाभ होतो.
 
विवाहपूर्व शारीरिक संबंधांची चर्चा दुसऱ्या कोणाशीही करू नका. संबंधांत कटुता येईल.
काम व आकर्षण बीजमंत्राचा जप करा.
 
पत्रिका जुळत असतील तर विवाह करणे आणखीच योग्य
मंत्र - ॐ क्लीं नम:।

Edited by : Smita Joshi