अल्झायमरवर कॉफी हे रामबाण उपाय
जसे जसे वय वाढत जाते तसे तसे चिंतनशक्तीवर त्याचे दडपणही वाढत जाते. यावर अनेक उपचार असले तरी कॉफी हा त्यावरचा सर्वोत्तम उपाय असल्याचा शोध ब्रिटनमधील वैज्ञानिकांनी लावला आहे.
डकोत विद्यापीठाचे प्रमुख शोधकर्ता जोनाथन गिजेर यांनी या विषयीचे संशोधन केले आहे. त्यांनी केलेल्या संशोधनात कॉफीतील कॅफेनने मेंदूवरील दडपण कमी होत असल्याचे आढळून आले. तसेच रोज केवळ एक कप कॉफी घेतल्याने शरीरातील वाढलेल्या कोलेस्टरॉलमुळे निर्माण होणार्या संभाव्य धक्क्यांनाही आळा बसू शकतो, असा त्यांचा दावा आहे.