शनिवार, 9 नोव्हेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य लेख
Written By
Last Modified: बुधवार, 19 मे 2021 (18:27 IST)

कच्च्या भाज्या खाऊ नका, महागात पडू शकतं

कोरोनाकाळात लोकांनी आपली रोग प्रतिकारक शक्तीला वाढविण्यासाठी आहारात बदल केले आहे. लोकांचा कल सध्या आरोग्यवर्धक आहार खाण्याकडे वाढत आहे. व्यायामाला आणि योगाला त्यांनी आपल्या दिनचर्येत समाविष्ट केले आहेत. परंतु असं म्हणतात की अपूर्ण ज्ञान नेहमी धोकादायक असतो. लोक आरोग्य आणि रोग प्रतिकारक शक्ती चांगली ठेवण्यासाठी  फळे आणि भाज्यांचे सेवन करत आहे. त्यासाठी कच्च्या भाज्या देखील खात आहे. 
वैज्ञानिक आणि आयुर्वेदिक या दोन्ही दृष्टिकोनातून हे शरीरासाठी घातक आहे. कित्येक लोकांचा असा विश्वास आहे की कच्चे फळ आणि भाज्या खाण्यामुळे शरीराला आवश्यक पोषण मिळतं. तसेच भाज्या शिजवल्याने त्यांचा मधील गुणधर्म नाहीसे होतात .
 
कच्च्या गोष्टी खाऊ शकतो का? 
कच्चे फळ, सॅलड आणि शेंगदाणे खाऊ शकतो.परंतु भाज्यांना नेहमी शिजवूनच खावे. कच्च्या भाज्या आणि फळे कमीत कमी तीन पाण्याने धुतलेले असावे. फळे आणि भाज्या आपण मिठाच्या पाण्यात देखील धुवू शकता. जेणे करून त्यावर चिटकलेले बारीक जंत आणि घाण निघून जावे. 
 
पचनसंस्थेसाठी धोकादायक - 
शिजवलेले अन्न खावे याची तज्ञांकडून शिफारस केली जाते कारण ते सहज पचतं. शिजवलेलं अन्न खाल्ल्याने पाचन तंत्रालाही कोणती इजा होत नाही. परंतु कच्च्या भाज्या खाल्ल्याने पाचन तंत्रावर जास्त परिणाम होतो. कच्च्या भाज्या पचविणे अवघड असतं.  या मुळे बर्‍याच वेळा पोटात दुखणे देखील सुरू होते. भाजी थोडी शिजवून   त्यात थोडी हळद आणि थोड मीठ घालून खाऊ शकता.
बर्‍याचवेळा  पाण्यात कच्च्या भाज्या धुतल्यावर देखील त्यात बारीक किडे राहतात, म्हणून डॉ आणि तज्ञांनी भाज्या शिजवून खाण्याचा सल्ला देतात. बर्‍याच वेळा कच्च्या खाद्यपदार्थांमध्ये बॅक्टेरिया असतात, ज्यामुळे ते पोटात कोणत्याही प्रकारचे संक्रमण करू  शकतात. एवढेच  नव्हे तर स्टोन होण्याचा धोकादेखील असू शकतो. म्हणून, सॅलड ,शेंगदाणे आणि फळे व्यतिरिक्त, अन्न शिजवून आणि उकळवूनच खावे.