1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य लेख
Written By
Last Modified शुक्रवार, 25 सप्टेंबर 2020 (15:47 IST)

काय सांगता, रेस्टारेंटमध्ये जेवल्यानं कोरोना संसर्ग वाढतो

संसर्गाच्या पूर्वी सुमारे 41 टक्के लोकं जेवण्यासाठी रेस्टारेंटमध्ये गेले होते. रेस्टारेंटमध्ये जेवताना, पाणी पिताना, मास्क लावणं आणि सामाजिक अंतर राखणं अवघड होतं. ते 41 टक्के लोकं कोरोनाच्या संसर्ग असणाऱ्यांच्या संपर्कात आले होते. पण त्यापूर्वी ते संसर्ग होण्याच्या 14 दिवसाच्या आत जेवण्यासाठी गेलेले होते. किंवा कॉफी शॉप मध्ये गेल्याचे समजले.
 
अमेरिकेतील सेंटर फॉर डिजीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शनने एका संशोधनात म्हटले आहे की जी लोकं खाण्या-पिण्यासाठी रेस्टारेंट किंवा बाहेर हॉटेलात खाण्यासाठी जातात त्यांना कोरोनाचा संसर्ग दुपटीने होतो. असं सीडीसी ने 11 सप्टेंबर रोजी प्रकाशित केलेल्या आपल्या मोर्बेडीटी अँड मोर्टेलिटी या नावाने दिलेल्या अहवालात सांगितलं आहे. 
 
भारतासाठी हा अहवाल खूप महत्त्वाच्या आहे. सध्या भारतात सर्व ठिकाणी रेस्टारेंट आणि खाण्यापिण्याची स्थळ उघडल्या आहेत. शिवाय लग्न समारंभ सारख्या कार्यक्रमासाठी सवलती दिल्या आहेत. अश्या परिस्थितीत आपल्याला जास्तीत जास्त काळजी घेण्याची गरज आहे. सध्या कोरोना सर्वत्र पसरलेला आहे. त्यामुळे आपण स्वतःची आणि आपल्या कुटुंबीयांची काळजी घ्या आणि सावधगिरी बाळगा. मास्क आणि सेनेटाईझरचा वापर आवर्जून करावा.