Dharma Sangrah
✕

पायांमध्ये हे 4 बदल कोलेस्ट्रॉल वाढल्याचे देतात संकेत, दुर्लक्ष केल्यास हृदयविकाराचा झटका येऊ शकतो

Updated: मंगळवार, 19 मार्च 2024 (18:11 IST)
 
थंड पाय- हिवाळ्याच्या काळात पायांना थंडी वाजणे सामान्य गोष्ट आहे. परंतु जर तुमचे पाय आणि तळवे नेहमी थंड असतील तर ते उच्च कोलेस्ट्रॉलचे लक्षण असू शकते. उन्हाळ्यातही तुमचे पाय थंड राहिल्यास या स्थितीकडे दुर्लक्ष करू नका आणि ताबडतोब डॉक्टरांकडून तपासणी करून घ्या.
 
पायांमध्ये वेदना आणि पेटके- उच्च कोलेस्टेरॉलमुळे, पायांमध्ये तीव्र वेदना आणि पेटके जाणवू शकतात. जेव्हा पायांच्या धमन्या ब्लॉक होतात तेव्हा ऑक्सिजनयुक्त रक्त पायांच्या खालच्या भागात पोहोचू शकत नाही. यामुळे पाय दुखणे आणि जडपणा जाणवू शकतो. जर तुम्हालाही अशा प्रकारचा त्रास होत असेल, तर तुम्ही ताबडतोब तुमच्या कोलेस्ट्रॉलची पातळी तपासा.
 
पायांच्या रंगात बदल- कोलेस्ट्रॉल वाढल्यामुळे पायांच्या त्वचेचा रंग बदलू लागतो. जेव्हा उच्च कोलेस्ट्रॉल असते तेव्हा शरीरात रक्तप्रवाह नीट होत नाही. त्यामुळे पेशींना पुरेसे पोषण मिळत नाही. यामुळे पायांची त्वचा वांगी किंवा निळी दिसू शकते. अशा लक्षणांकडे दुर्लक्ष करणे टाळा.
 
पायाच्या जखमा बऱ्या होत नाहीत- पाय किंवा तळव्यावर झालेली जखम लवकर बरी होत नसेल तर ते उच्च कोलेस्टेरॉलचे लक्षण असू शकते. शरीरातील कोलेस्टेरॉलची पातळी वाढल्यामुळे रक्ताभिसरण नीट होत नाही. यामुळे जखम लवकर भरून येत नाही. अशा परिस्थितीत आपण त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधावा.
 
जेव्हा शरीरात खराब कोलेस्टेरॉलची पातळी वाढते तेव्हा शरीरात अनेक प्रकारची लक्षणे दिसू शकतात. तुमच्या पायात असे बदल दिसल्यास ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधा.
 
अस्वीकरण: येथे दिलेली माहिती सामान्य समजुतीवर आधारित आहे आणि केवळ माहितीसाठी दिली जात आहे. वेबदुनिया याला दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ञाचा सल्ला अवश्य घ्या.

सर्व पहा

थंडीची चाहूल आणि गरमागरम मेजवानी: ५ हिवाळी स्पेशल रेसिपी!

केस गळणे आणि कोरडेपणावर रामबाण उपाय: कांद्याच्या सालींपासून बनवा प्रभाव जादुई तेल आणि हेअर पॅक

पायाच्या तळव्यावर तीळ उघडतो परदेश वारी आणि श्रीमंतीचे योग! वाचा सामुद्रिक शास्त्रातील माहिती

मंदिरांमध्ये हत्ती का ठेवले जातात? त्यांच्यामागची परंपरा आणि धार्मिक महत्त्व जाणून घ्या

गरुड पुराण: चितेवर शरीर जळून राख होते, पण 'या' ५ गोष्टी आत्म्यासोबत जातात!

सर्व पहा

केस धुण्यापूर्वी काय करावे? शॅम्पू करण्यापूर्वी केसांची या प्रकारे घ्यावी काळजी; सोपे उपाय

हिवाळ्यात सकाळी फिरायला जाताना या ५ गोष्टी आवर्जून लक्षात ठेवा!

थंडीत पोळी अनेक तास गरम राहील; साठवण्यापूर्वी या सोप्या टिप्स लक्षात ठेवा

काही मिनिटांतच भीती नाहीशी होईल, आत्मविश्वास वाढवण्यासाठी ही योगासने दररोज करा

लग्नात हातावर हवी गडद मेहंदीची रंगत? तर मेहंदी लावण्यापूर्वी जाणून घ्या या खास टिप्स!

पुढील लेख
Show comments