शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य लेख
Written By
Last Modified: शुक्रवार, 28 मे 2021 (09:26 IST)

Motivational Tips मानसिक शांती हवी असेल तर या 10 गोष्टी करा

मन काय है? मनाला काय हवं-हवंस वाटतं? मनाचं आणि हृद्याचं नातं काय? मन चांगलं असल्या हृद्याला कसं बरं वाटतं? खरं तर आम्ही जो विचार करतो ती आमच्या मनाची अवस्था असते. मनामुळे आमचे विचार तयार होतात. म्हणतात न जसे विचार तसे आम्ही घडतो. बर्‍याचदा आपण असेही ऐकले आहे की खरं तर, जीवनाची कोणतीही समस्या मोठी नसते परंतु त्या समस्येप्रती आपला दृष्टीकोनामुळे समस्या मोठी वाटू लागते.
 
त्याचप्रमाणे मन आणि हृदय यांच्यातही खूप चांगले संबंध आहेत. सर्व प्रथम, आपण विचारांच्या पातळीवर बदलून आपले हृदय मोठे केले पाहिजे. छोट्या छोट्या गोष्टी आपले व्यक्तिमत्व लहान करतात. जर आपण जीवनात उच्च उद्दिष्टे आणि उदार विचारांनी चालत राहिलो तर आपले व्यक्तिमत्त्वही मोठे होते. परंतु मन कधीकधी एकतर्फी विचारात उदास होतं, अशात बहरण्यासाठी आणि खुलुन जगण्यासाठी हृदय विशाल करणे आवश्यक आहे.
 
एखादी गोष्ट आमच्या हृद्याला ठेस पोहचवते तेव्हा आम्ही मनाला संकुचित करतो परंतु काही काळासाठी आपल्याला दु:ख होतो पण मन वाहत असलेल्या पाण्याप्रमाणे जाणवतं.
 
अंतःकरण मोकळे करण्यासाठी, मन मोठे करण्यासाठी आपण आपल्या स्तरावर 10 लहान प्रयत्न केले पाहिजेत.
 
1 क्षमा करावं
2 क्षमा मागावी
3 विसरा
4 हसत रहा
5 संगीत ऐका
6 मनातलं बोला
7 'जाऊ द्या' चे धोरण स्वीकारा
8 खेळात रस वाढवा
9 योगा करा
10 'जगा व जगू द्या' चे तत्व स्वीकारा
 
या 10 गोष्टींमुळे व्यक्तिमत्त्व चमकते कारण हृद्यासाठी या 10 गोष्टी मदत करतात. आणि जेव्हा छोट्या छोट्या गोष्टींमुळे हृदय अस्वस्थ होत नाही आणि निराश होत नाही, तेव्हा मन मुक्त राहील.
 
हेच व्यक्तिमत्त्वाच्या बाह्य पातळीवर लागू होते. अभिव्यक्ति प्रखर असावी. उदार आणि मुक्त हृद्यामुळे आपली गोष्ट ठेवण्याची हिंमत येते आणि जीवन सोपं होतं. तरी इतरांचे युक्तिवाद, इतरांचे विचार ऐकण्यास सक्षम व्हाल. याने मतभेद असले तरी मनभेद होणार नाही.
 
जेव्हा हृदय उघडलेले असते तेव्हाच आपले मन उघडू शकतात आणि हृदय उघडण्यासाठी, ताजेतवाने आणि नातेसंबंधांवर विश्वास असणे आवश्यक असते. कोरोना वेळेत स्वत: ला भावनिक पातळीवर ठेवून बघा आणि आपले आनंद कशात आहे ते जाणून घ्या, पुन्हा जिवंत व्हा..