deepawali
✕

Importance of calcium कॅल्शियमचे महत्त्व

Updated: गुरूवार, 27 जुलै 2023 (18:27 IST)
ऑस्टिओपोरोसिस हा विकार वृद्धत्वात टाळण्यासाठी शरीराला कॅल्शियम मिळणे आवश्यक आहे, हे लोकांच्या मनावर बिंबले आहे. मात्र आता याबाबतीत सुद्धा तज्ज्ञांमध्ये वेगळा अनुभव यायला लागला आणि त्यांनी याबाबतीत थोडा सावधानतेचा इशारा दिला आहे.
 
भरपूर कॅल्शियम म्हणजे मजबूत हाडे, असे काही समीकरण तयार करता येणार नाही. तेव्हा हाडे मजबूत करण्यासाठी कोणी अतिरेकी कॅल्शियम घेत असेल तर त्यांनी त्यापासून सावध राहिले पाहिजे. काही वेळा मर्यादेपेक्षा अधिक कॅल्शियमचा पुरवठा शरीराला झाला तर उलट हाडांचे नुकसान होऊ शकते, असा इशारा त्यांनी दिला आहे. या संबंधीचे शास्‍त्र थोडे समजून घेतले पाहिजे. ऑस्टिओपोरोसिस हा कॅल्शियमच्या कमतरतेचा विकार नाही. तेव्हा केवळ कॅल्शियम घेतल्याने हाडे मजबूत होतील आणि वृद्धावस्थेमध्ये ऑस्टिओपोरोसिसपासून सुटका होईल असे काही मानता कामा नये. ऑस्टिओपोरोसिस हा फार गुंतागुंतीचा विकार आहे. त्यामागे व्यायामाचा अभाव, दीर्घकाळचा शरीराचा दाह, जीवनसत्त्वाचा अभाव, सूक्ष्म द्रव्यांचा अभाव आणि पोषण विषयक असमतोल हीही ऑस्टिओपोरोसिसची कारणे आहेत. तेव्हा हे लक्षात घेतले म्हणजे कॅल्शियमच्या गोळ्या खाल्ल्याने ऑस्टिओपोरोसिस टळेल, हा गैरसमज असल्याचे समजेल. हे टाळायचे असेल तर ड जीवनसत्त्वाचा पुरवठा करणारा आहार घेतला पाहिजे. शरीराला थोडे उन्हातून फिरवले पाहिजे. उन्हातून मुबलक प्रमाणात ड जीवनसत्त्व मिळते.
 
अपर्णा देवकर

सर्व पहा

फुफ्फुसे मजबूत करण्यासाठी दररोज फक्त १० मिनिटे प्राणायाम करा, फायदे जाणून घ्या

कमी वेळात काढा सोपी अन् सुंदर रांगोळी! ५ मिनिटांत बनणाऱ्या ४ बेहतरीन डिझाइन्स

टिकू तलसानिया आणि पूजा जोशी यांच्या 'देवी विज्ञानम' या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

धूर्तपणाचे वाईट परिणाम होतात; पिंजऱ्यातील सिंह...हितोपदेशातील गोष्ट

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी घराच्या मुख्य दारावर 'या' ५ गोष्टी नक्की लावा

सर्व पहा

मासिक पाळी नियमित येत असली तरी PCOS असू शकतो! शरीरातील ही लक्षणे ओळखा आणि वेळीच सावध व्हा

प्रदूषणमुक्त दिवाळीसाठी मुलांना शिकवा या सवयी; फटाक्यांशिवायही सण होईल आनंदी!

तेनालीराम कहाणी : शुभ मुहूर्त आणि पहिली टोपली

चांदीचे नाणे खरे की खोटे? हे ओळखण्याची ही युक्ती नक्की वापरून पहा

जगात एकापेक्षा जास्त हृदये असलेल्या प्राण्यांबद्दल तुम्हाला माहिती आहे का?

पुढील लेख
Show comments