शुक्रवार, 22 नोव्हेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य लेख
Written By
Last Modified: शनिवार, 22 जुलै 2023 (23:31 IST)

To take birth control pills or not गर्भनिरोधक गोळ्या घ्यायल्या हव्यात की नको? त्याचे दुष्परिणाम होतात का?

सुशीला सिंह
 
To take birth control pills or not अमेरिकेत महिला डॉक्टरच्या चिठ्ठीशिवाय गर्भनिरोधक गोळ्या विकत घेऊ शकतात.
 
याबाबतीत अमेरिकेच्या फूड अँड ड्रग अॅडमिनिस्ट्रेशनने घोषणा केली की गर्भनिरोधक गोळ्या 'ओपिल' प्रत्येक वयाच्या बायका घेऊ शकतात.
 
'ओपिल' चं म्हणणं आहे की, 2024 च्या सुरुवातीला औषधाच्या दुकानात त्यांच्या गोळ्या मिळतील.
 
अमेरिकेसहित 100 असे देश आहेत जिथे औषधाच्या दुकानात गर्भनिरोधक गोळ्या मिळतात.
 
या देशांच्या शेजारी असलेल्या लॅटिन अमेरिका, चीन, ब्रिटन अमेरिका यांच्याशिवाय भारताचासुद्धा समावेश आहे.
 
अमेरिकेत महिला तज्ज्ञांच्या मते गर्भनिरोधक गोळ्यांविषयी महिला विशेषत: तरुणींना तो कलंक असल्यासारखं होतं. आता ते दूर होईल. त्याबरोबर प्रजननाशी निगडीत उपचार घेण्यातही त्यांना अडचणी यायच्या. आता त्यांना मदत मिळेल.
 
नॅशनल लायब्रेरी ऑफ मेडिसिनमध्ये प्रकाशित झालेल्या मेडिसिनच्या इतिहासात हजारोंच्या संख्येत औषधं विकसित केली गेली. मात्र, 1950 मध्ये गर्भ निरोधक गोळ्यांच्या विकासानंतर त्यात मोठा बदल झाला.
 
यात असलेल्या माहितीनुसार महिलांना स्वातंत्र्य मिळालं आहे आणि प्रजननाबद्दल स्वातंत्र्यही दिलं आहे.
 
भारताततलं कुटुंब नियोजन
आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या वेबसाईटवर प्रकाशित झालेल्या माहितीनुसार भारतात पहिल्यांदा 1952 मध्ये राष्ट्रीय कुटुंब नियोजन योजनेची सुरुवात करण्यात आली होती.
 
योजना लागू झाल्यावर त्याचा मोठ्या प्रमाणावर विस्तार झाला. त्याच्यानुसार सरकारकडून आरोग्य केंद्रावर गर्भनिरोधक गोळ्या आणि कंडोम मोफत दिले जातात. तसंच आशा कार्यकर्त्यासुद्धा लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करतात.
 
स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. एस . एन. बसू म्हणतात, “भारतात गर्भ निरोधक गोळ्या या कुटुंब नियोजनाची प्रभावी पद्धत आहे. जर योग्य पद्धतीने गोळ्या घेतल्या तर त्या 100 टक्के गर्भधारणा होण्यापासून थांबवतात. तसंच महिलांना पहिल्या मुलानंतर दुसरं मूल कधी हवं याचं स्वातंत्र्य दिलं.”
 
गर्भनिरोधक गोळ्यांमध्ये इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्ट्रॉन असतात त्याला सीओसी म्हणतात, तर दुसऱ्या गोळीत प्रोजेस्ट्रॉन असतं. त्याला पीओपी असं म्हणतात.
 
दिल्ली मधल्या अमृता हॉस्पिटल मध्ये असलेल्या स्त्रीरोग तज्त्र प्रतिमा मित्तल म्हणतात की, आधी तोंडावाटे घेण्यात येणाऱ्या गर्भ निरोधक गोळ्यांमध्ये इस्ट्रोजनचं प्रमाण जास्त असायचं. त्याचे दुष्परिणाम होते, मात्र त्याची मात्रा कमी होते.
 
त्यांच्या या मुद्दयाबद्दल स्त्री रोगतज्ज्ञ डॉ. सुचित्रा दळवी म्हणतात की, महिलांच्या शरीरात इस्ट्रोजन आणि आणि प्रोजेस्ट्रॉन दोन्ही हार्मोन्स असतात. गर्भ निरोधनात त्याच हार्मोन्सचा वापर होतो. शरीरावर त्यांचे वेगवेगळे परिणाम होतात.
 
गर्भनिरोधक गोळ्यांचा प्रभाव
या तीन डॉक्टरांचं असं म्हणणं आहे की गर्भनिरोधक गोळ्यांचा फार काही दुष्परिणाम होत नाही. मात्र सीओसी आणि पीओपी घेतल्यामुळे महिलांच्या शरीरावर काही परिणाम होऊ शकतो.
 
ज्या औषधांमध्ये इस्ट्रोजन असतं त्याचा महिलांना फायदा होतो. ज्यांच्या शरीरात रक्ताच्या गुठळ्या असतात, ज्यांना हृदयाशी निगडीत आजार असतात, ज्यांना रक्तदाबाचा त्रास असतो, त्यांना फायदा होतो.
 
ज्या औषधांमध्ये प्रोजेस्ट्रॉन असतं, त्यांना जीव घाबरणं, डोकेदुखी, अनियमित मासिक पाळी, चक्कर येणं अशासारखे आजार होऊ शकतात.
 
या गोळ्या घेण्याच्या आधी किडनी, लिव्हर, आणि कॅन्सर सारखे आजार तर नाहीत याची खातरजमा केली जाते.
 
डॉक्टरांच्या मते गर्भनिरोधक गोळ्या घेतल्यामुळे महिलांवर वेगवेगळे परिणाम होतात.
 
या गोळ्यांचा शरीरावर होणारे परिणाम
 
-शरीरात पाणी होणं
 
- शरीरात जडत्व येणं
 
- पिंपल्स येण्याचा धोका वाढतो.
 
- स्तनांमध्ये जडत्व येणं
 
-मूड स्विंग्स होणं.
 
डॉ. प्रतिमा मित्तल सांगतात की, गर्भनिरोधक घेता येऊ शकतात आणि त्याचे दुष्परिणाम होत नाही.
 
डॉ. सुचित्रा देळवी महिलांच्या हक्काबद्दलही बोलत असतात. त्या म्हणतात, “जर एखादी महिला धूम्रपान करत असेल आणि ती गर्भनिरोधक गोळ्या घेत असेल ज्यात इस्ट्रोजन असेल तर त्यामुळे रक्ताच्या गुठळ्या होतात. त्याच औषधात प्रोजेस्ट्रॉन असेल तर त्याचा परिणाम होत नाही. "
 
त्याचवेळी डॉक्टरांचं असं मत आहे की, महिलांच्या आरोग्यानुसार या गोळ्या घेण्याचे काही फायदेही असतात.
 
गर्भ निरोधक गोळ्यांचे फायदे
सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या गोळ्यांमुळे कुटुंब नियोजन करता येतं.
 
मासिक पाळी नियमित होण्यात मदत होते.
 
मासिक पाळी दरम्यान होणारा रक्तस्राव कमी होण्यास मदत होते.
 
ओव्हरींचा कर्करोग होण्याची शक्यता कमी होती.
 
या गोळ्या घेतल्याने कॅन्सरचा धोका वाढतो असा एक गैरसमज आहे मात्र डॉ. प्रतिमा मित्तल म्हणतात की हा एक गैरसमज आहे.
 
डॉ. सुचित्रा देलवी म्हणतात, याचा अर्थ असा नाही की तुम्ही रोज ही औषधं घेत असाल तर हे हार्मोन तुमच्या शरीरात जमा होतं असं नाही, उलट यकृताद्वारे ते शरीराबाहेर जातं.
 
डॉक्टर सांगतात की कोणत्याही प्रोटेक्शनशिवाय लैंगिक संबंध प्रस्थापित झाले तर 120 तासाच्या आत आय पिल घेण्याचा सल्ला दिला जातो. त्यामुळे गर्भधारणेची शक्यता कमी होते. आयपिलमध्ये प्रोजेस्ट्रॉनचा वापर होतो आणि त्याचं प्रमाण जास्त आहे.
 
महिलांवरच ओझं का?
गर्भ निरोधक गोळ्यांमुळे स्त्रियांना स्वातंत्र्य मिळालं तरी जबाबदारीही त्यांच्यावरच पडली आहे असं तज्ज्ञांचं मत आहे.
 
पुरुषांसाठी गर्भ निरोधनाची साधनं नाही अशातला भाग नाही.
 
सरकारच्या कुटुंब नियोजनाच्या कार्यक्रमाअंतर्गत गोळ्यांबरोबर कंडोमही दिले जातात. मात्र आकडेवारी पाहता त्याचा वापर कमी प्रमाणात होतो.
 
डॉक्टरांच्या मते पुरुषांकडे गर्भ निरोधनाची साधनं कमी आहेत. त्यात कंडोम आणि नसबंदीचा समावेश आहे.
 
मात्र दोन्ही गोष्टींविषयी अनेक मिथकं किंवा गैरसमज आहेत. कंडोममुळे लैंगिक सुख मिळत नाही हा त्यातलाच एक गैरसमज आहे. तर नसबंदीमुळे शरीरात दुर्बलता येते आणि त्याचा विपरीत परिणाम महिलांवर होतो असाही एक गैरसमज आहे.
 
हे गैरसमज दूर करण्यासाठी जागरुकता पसरवली जात आहेत. पुरुषांच्या विचारसरणीतही बदल झाला आहे मात्र त्याचं प्रमाण अद्याप अत्यल्प आहे.