शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य लेख
Written By

प्लास्टिक करते गर्भात वाढणार्‍या बाळावर परिणाम

आजच्या युगात प्लास्टिकशी संबंध येत नसेल अशी एकही व्यक्ती सापडणार नाही. सामान्य जनजीवनात प्लास्टिकचा एवढा वापर वाढला आहे की ते आज दैनंदिन आयुष्याचा हिस्सा बनले आहे.
प्लास्टिकचा मोठ्या प्रमाणावर वापर होत असताना त्याचा एक आणखी धोका समोर आला आहे. एका ताज्या संशोधनानुसार, गर्भावस्थेदरम्यान एखादी महिला प्लास्टिकचा जास्त वापर करत असेल तर त्याचा गर्भात वाढणार्‍या बाळावर परिणाम होतो. अशा मुलांमध्ये मोठेपणी अस्थमाचा धोका वाढतो. शास्त्रज्ञांनी सांगितले की, प्लास्टिक नरम आणि जास्त लवचिक बनविण्यासाठी त्यात थॅलेट नावाच्या रसायनाचा वापर केला जातो. त्वचा, भोजन व श्वासावाटे हे रसायन शरीरातील हार्मोनच्या स्त्रावालाही प्रभावित करण्यास सक्षम आहे. त्याचा पचन संस्था व प्रजनन क्षमतेवरही दुष्प्रभाव पडतो.
 
या अध्ययनाचे प्रमुख जर्मनीतील हेमहोत्ज विद्यापीठातील शास्त्रज्ञ तोबियास पोल्ते यांनी सांगितले की थॅलेट आपल्या रोगप्रतिकारक शक्तीला प्रभावित करून अॅलर्जीला कारणीभूत ठरू शकते. शास्त्रज्ञांनी प्लास्टिकची भांडी व प्लास्टिकमध्ये हवाबंद केलेल्या खाद्यपदार्थांचा वापर करताना सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला आहे.