शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य लेख
Written By

झोपण्याच्या पध्दतीवर आयुष्यमान अवलंबून

आपल्या वयाचा किंवा आपले एकूण आयुष्यमान किती असेल, ह्याचा थेट संबंध आपल्या झोपेशी किंवा स्लीपिंग पॅटर्नशी आहे असा खुलासा ब्रिटनध्ये प्रसिद्ध झालेल्या एका शोधामध्ये केला गेला आहे. ब्रिटनमध्ये वय वर्षे 38 पासून ते 73 वर्षांच्या वयोगटातील चार लाखांहूनही जास्त लोकांच्या स्लीपिंग पॅटर्नचे अवलोकन करून हे निदान करण्यात आले आहे. 
 
ज्या व्यक्ती रात्री उशिरापर्यंत जागरण करून सकाळी उशिरा उठतात, त्या व्यक्तींचे आयुष्यान, रात्री लवकर झोपून सकाळी लवकर उठणार्‍या व्यक्तींच्या आयुष्यानापेक्षा कमी असल्याचे ह्या शोधाद्वारे सिद्ध झाले आहे. म्हणजेच उशिरा झोपून उशिरा उठणार्‍या व्यक्तींचे आयुष्यमान कमी  असते असे हा शोध सांगतो. इंग्लंडमधील शोधकर्ता माल्कम वॅन शेंत्झ ह्यांनी आपला स्लीपिंग पॅटर्न आपल्या आरोग्याशी थेट संबंधित असल्याचे म्हटले आहे. माल्कम आणि क्रिस्टन यांनी अवलोकन केलेल्या व्यक्तींपैकी 27 टक्के व्यक्ती आपली बहुतांशी कामे सकाळच्या वेळामध्ये करणार्‍या होत्या, 35 टक्के व्यक्ती सकाळी जास्त काम करणार्‍या, पण संध्याकाळीही थोडीफार कामे करणार्‍या होत्या, 28 टक्के व्यक्ती सकाळी कमी आणि संध्याकाळी जास्त कामे करणार्‍या होत्या, तर 9 टक्के व्यक्ती सर्व कामे रात्रीच्या वेळीच करणार्‍या होत्या. ह्या व्यक्तींचे अवलोकन करताना त्यांचे वजन, एकंदर आरोग्य, धू्म्रपान किंवा मद्यपानाच्या सवयी, सामाजिक आणि आर्थिक परिस्थिती ह्या सर्व गोष्टींचा विचार करण्यात आला होता.