शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य लेख
Written By

मानसिक धक्क्यातून सावरणारे अनोखे इंजेक्शन

बहुतांश देशांमध्ये आपले सैन्य तैनात करून अमेरिका भलेही स्वत:ला शक्तिशाली समजत असली तरी त्याचे दुष्परिणामही या देशासाठी चिंतेचा विषय बनले आहेत. परदेशात तैनात असलेला सहापैकी एक सैनिक ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिस्ऑर्डर म्हणजे मानसिक धक्क्याची शिकार आहे. काही अमेरिकी सैनिक प्रतिकूल परिस्थितीत बसलेल्या धक्क्यामुळेच आत्महत्येच्या विचारांपर्यंत पोहोचतात.
अशा सैनिकांना या धक्क्यातून सावरण्यासाठी अमेरिकी लष्कर आता एक खास इंजेक्शन तयार करत असून त्याच्या एका खुराकने सैनिक त्यातून सावरतील. हे अॅनेस्थीसियाचे इंजेक्शन असून मानेच्या उजव्या बाजूला व स्टॅलेट गँगलियॉन मज्जातंतूवर धोक्याच्या वेळी मेंदूला सचेत करतात. हे इंजेक्शन मज्जातंतूमध्ये अशी सुधारणा करते की जणू व्यक्तीला काही झालेच नव्हते. रूग्णाला इंजेक्शन देताच बरे वाटते. बर्‍याच जणांसाठी आयुष्यभरासाठी हे एकच इंजेक्शन पुरेसे ठरेल, तर काही फार झाले तर दोन. 
 
अमेरिकी लष्कराने या इंजेक्शनच्या निर्मितीवर 20 लाख डॉलर खर्च केला आहे. माजी स‍ैनिकांना आत्महत्येपासून परावृत्त करण्यासाठी अमेरिकेने 2015 मध्ये क्ले हंट सुसाइड प्रिव्हेंशन फॉर अमेरिकन वेटर्न कायदा मंजूर करण्यात आला होता. त्याअंतर्गत माजी सैनिकांच्या आरोग्यासांबंधी तरतूद केली आहे. अफगाणिस्तान आणि इराक युद्धात लढलेल्या अमेरिकेच्या माजी सैनिकांपैकी बहुतांश सैनिक मानसिक धक्क्याच्या कचाट्यात आहेत.
 
या युद्धात त्यांना अतिशय प्रतिकूल परिस्थितीत राहावे लागले होते. तेव्हापासून 35 हजार अमेरिकी सैनिकांनी आत्महत्या केली.