Dharma Sangrah
✕

World Health day जागतिक आरोग्य दिन कधी साजरा केला जातो, इतिहास जाणून घ्या

Updated: बुधवार, 6 एप्रिल 2022 (12:16 IST)
 
जागतिक आरोग्य संघटनेतर्फे दरवर्षी 7 एप्रिल रोजी जागतिक आरोग्य दिन साजरा केला जातो. हा दिवस लोकांच्या आरोग्याची पातळी सुधारण्यासाठी आणि लोकांना आरोग्याबाबत जागरूक करण्यासाठी साजरा केला जातो. जगभरातील प्रत्येक व्यक्तीला चांगले आरोग्य आणि सुविधा मिळाव्यात हा हा उत्सव साजरा करण्यामागचा उद्देश आहे.
 
World Health Day History जागतिक आरोग्य दिनाचा इतिहास
जागतिक आरोग्य संघटनेची स्थापना सन 1948 मध्ये 7 एप्रिल रोजी झाली. आणि जागतिक आरोग्य दिन 1950 मध्ये साजरा करण्यास सुरुवात झाली. सुरुवातीला फार कमी देश या संस्थेशी जोडले गेले होते, पण कालांतराने सदस्य देशांची संख्या वाढत गेली. सध्या जागतिक आरोग्य संघटनेत 193 देशांचा समावेश आहे.
 
World Health Day Purpose जागतिक आरोग्य दिनाचा उद्देश
जागतिक आरोग्य दिनाचा उद्देश लोकांना त्यांच्या आरोग्याबद्दल आणि भारत सरकारद्वारे चालवल्या जाणार्‍या आरोग्य कार्यक्रमाबद्दल जागरुक करणे हा आहे. हा दिवस साजरा करण्याचा उद्देश जगभरात एकसमान आरोग्य सुविधा उपलब्ध करून देणे आणि लोकांना आरोग्याच्या अफवांपासून दूर ठेवणे हा आहे. जागतिक आरोग्याशी संबंधित समस्यांवर विचार करणे आणि त्यावर कार्य करणे.
 
World Health Day जागतिक आरोग्य दिवस
गेल्या 72 वर्षांपासून जागतिक आरोग्य संघटना जागतिक स्तरावर खूप चांगले काम करत आहे. ही संस्था जागतिक स्तरावर आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्या सरकारी आरोग्य संस्था, व्यावसायिक गट आणि इतर संस्थांना आरोग्याशी संबंधित सुविधा पुरवण्यासाठी आहे.
 
World Health Day Theme 2022 जागतिक आरोग्य दिन 2022 ची थीम 
प्रत्येक वर्षी या तारखेसाठी एक थीम निवडली जाते जी WHO साठी प्राधान्य क्षेत्र हायलाइट करते. जागतिक आरोग्य दिन 2022 ची थीम Our Planet, Our Health अर्थातच 'आमचा ग्रह, आमचे आरोग्य' अशी आहे.

सर्व पहा

देवी दुर्गेच्या नऊ रूपांची नावे, महत्त्व आणि प्रत्येक रूपाची पूजा करण्यामागील कारण

नवरात्रीत दुर्गा सप्तशती, देवी कवच की अर्गला स्तोत्र? कोणत्या पाठाचे काय महत्त्व आहे?

शारदीय नवरात्रि 2026: नवरात्रीत घटा जवळ अखंड दिवा लावत असाल, तर या गोष्टींची काळजी घ्या

पोवळा कोणी घालू नये? जाणून घ्या कोणत्या राशींसाठी मूंगा शुभ अन् काय आहेत नियम!

नवरात्रीच्या नऊ दिवसांत देवीला कोणती फुले वाहतात? दिवसानुसार फुलांची माहिती

सर्व पहा

तोंडाला चव आणणाऱ्या उपवासाच्या भाज्या Vrat Special Vegetable Recipes

पोटदुखीपासून आराम मिळवण्यासाठी घरच्या घरी करा हे सोपे उपाय

पीएचडी अरेबिक मध्ये करिअर बनवा, पात्रता, व्याप्ती ,पगार जाणून घ्या

स्ट्रेच मार्क्स कमी करण्यासाठी वापरा हे सोपे घरगुती उपाय

अकबर-बिरबलची कहाणी : खर्चाची अट

पुढील लेख
Show comments