गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य लेख
Written By
Last Modified: बुधवार, 6 एप्रिल 2022 (11:58 IST)

जागतिक आरोग्य दिवस कोट्स World Health Day Quotes in Marathi

World Health Day Quotes
आपण चांगले आरोग्य विकत घेऊ शकत नाही परंतु व्यायाम, योगासने आणि संतुलित आहाराद्वारे आपण ते मिळवू शकतो. स्वत:ला निरोगी ठेवण्यासाठी आत्मनियंत्रण महत्त्वाची भूमिका बजावते.
 
उत्तम आरोग्य म्हणजे शारीरिक, मानसिक आणि सामाजिक ताकद.
 
चांगले आरोग्य आणि चांगली समज ही सर्वात मोठी संपत्ती आहे.
 
सर्वकाही असूनही जर माणसाला आरोग्य नसेल तर समजा की त्याच्याकडे काहीही नाही.
 
चांगले आरोग्य आंतरिक शक्ती, शांत मन आणि आत्मविश्वास आणते. जे खूप महत्वाचे आहे.
 
व्यायामासाठी वेळ नाही असे ज्यांना वाटते, त्यांना आज ना उद्या आजारी पडण्यासाठी वेळ द्यावा लागतो.
 
चांगले आरोग्य लाभलेला माणूस सर्वात श्रीमंत माणूस आहे.
 
आरोग्य ही संपत्तीसारखी असते, जोपर्यंत आपण ती गमावत नाही तोपर्यंत त्याची खरी किंमत आपल्याला समजत नाही.
 
वेळेवर झोपणे आणि वेळेवर उठणे यामुळे तुमचे आरोग्य चांगले राहते. माणसाला निरोगी ठेवण्यासाठी दिनचर्या महत्त्वाची भूमिका बजावते.
 
जर तुम्ही सकाळी लवकर उठलात तर नक्कीच तुम्ही तुमच्या आरोग्याबाबत जागरूक असाल.
 
जोपर्यंत लोकांना रोग होत नाही तोपर्यंत आरोग्याची किंमत नसते.
 
जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर निरोगी असणे खूप गरजेचे आहे.
 
जे पैसे कमवण्यासाठी आरोग्य गमावतात, त्यांना नंतर आरोग्यासाठी पैसा गमवावा लागतो.
 
तुम्ही पैशाने महागडी औषधे विकत घेऊ शकता पण चांगले आरोग्य कधीच विकत घेऊ शकत नाही.
 
औषधाने जीवनात फक्त रोग बरा होतो पण आयुष्य कधीच वाढवता येत नाही.
 
तुमच्या आत इच्छाशक्ती असेल तर तुम्ही स्वतःला निरोगी बनवू शकता.
 
आरोग्य हे जीवनाचे सार आहे.
 
जेव्हा तुम्ही आजारी असता आणि अंथरुणावर असता तेव्हा आरोग्याचे महत्त्व कळते.
 
जर तुमचे तुमच्या खाण्यावर नियंत्रण नसेल तर तुमचे आरोग्यावर नियंत्रण नाही.
 
प्रत्येक माणूस स्वतःच्या आरोग्याचा लेखक असतो.