सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. जागतिक महिला दिन
Written By

Women's Day Wishes In Marathi जागतिक महिला दिनानिमित्त शुभेच्छा संदेश

स्री म्हणजे वास्तव्य, 
स्री म्हणजे मांगल्य, 
स्री म्हणजे मातृत्व, 
स्री म्हणजे कतृत्व 
जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा
 
नेहमी करते केवळ त्याग,
दुसऱ्यांसाठी घेते ती कष्ट फार,
मग तिलाच का सगळा त्रास,
जगू द्या तिलाही अधिकाराने
करा तिचा सन्मान
जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
 
तू आदिशक्ती तुच महाशक्ती वरदायिनी कालिका, 
तुझ्या कृपेने सजला नटला संसार हा जगाचा 
जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा
 
विधात्याची निर्मिती तू, 
प्रयत्नांची पराकाष्ठा तू
एक दिवस तरी साजरा कर तुझ्यासाठी तू
जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा
 
आदिशक्ती तू, 
प्रभूची भक्ती तू, 
झाशीची राणी तू, 
मावळ्यांची भवानी तू, 
प्रयत्नांना लाभलेली उन्नती तू, 
आजच्या युगाची प्रगती तू
जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा
 
विधात्याने घडवली सृजनांची सावली, 
निसर्गाने भेट दिली आणि घरी आली लेक लाडकी
महिला दिनाच्या शुभेच्छा
 
तू भार्या, 
तू भगिनी, 
तू दुहिता, 
प्रत्येक वीराची माता, 
तू नवयुगाची प्रेरणा 
या जगताची भाग्यविधाता
महिला दिनाच्या शुभेच्छा