शनिवार, 23 सप्टेंबर 2023
  1. लाईफस्टाईल
  2. लव्ह स्टेशन
  3. व्हॅलेंटाईन डे
Written By
Last Modified: रविवार, 13 फेब्रुवारी 2022 (22:18 IST)

व्हॅलेंटाईन डे मराठी शुभेच्छा Valentine Day Wishes In Marathi

घेता जवळी तु मला,
पारिजात बरसत राहतो.
हळव्या क्षणांच्या कळ्या,
देहावर फुलवत राहतो!
Happy Valentine’s Day
 
डोळ्यातल्या स्वप्नाला… कधी प्रत्यक्षातही आण
किती प्रेम करतो तुझ्यावर, हे न सांगताही जाण
Happy Valentine’s Day
 
तुझ्या प्रेमाचा रंग तो… अजूनही बहरत आहे
शेवटच्या क्षणा पर्यंत…. मी फक्त तुझीच आहे
Happy Valentine’s Day
 
नाही आज पर्यंत बोलता आले,
आज ते सारे तुझ्यापुढे मांडणार आहे…
नाही जगू शकत तुझ्याशिवाय,
इतकेच तुला सांगणार आहे…
प्रेम दिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा!
 
खुप लोकांना वाटते की,
“I LOVE YOU”
हे जगातील सुंदर शब्द आहेत,
पण खरं तर…
“I LOVE YOU TOO
हे जगातील सर्वात सुंदर शब्द आहेत
HAPPY VALENTINE DAY!
 
दिवसामागून दिवस गेले,
उत्तर तुझे कळेना..
आजच्या
या प्रेमदिवशी, समज माझ्या
वेदना…
प्रेमदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
 
आयुष्यभर साथ देणारी माझी सावली
आहेस तू, माझ्या डोळ्यात नेहमी राहणार
स्वप्न आहेस तू,
हाथ जोडून देवाकडे जे मागितलं होत ते
मागणं आहेस तू…
Happy Valentines Day
 
ना Rose पाहिजे,
ना Chocholate पाहिजे,
ना Teddy पाहिजे, ना Kiss पाहिजे,
ना Hug पाहिजे,
फक्त तुझी आयुष्यभर साथ पाहिजे…
Happy Valentines Day
 
सगळ्यांपेक्षा वेगळी आणि सुंदर
तू नक्कीच आहेस, पण
त्यापेक्षाही सुंदर तुझे माझ्या
आयुष्यात असणे आहे…
Happy Valentines Day
 
तुझ्यावर एवढं प्रेम करेल की,
याच जन्मी काय पुढच्या
सातही जन्मी
तु फक्त मलाच मागशील.
Happy Valentines Day
 
तुझ्यापासुन सुरु होउन
तुझ्यातच संपलेली मी,
माझे मी पण हरवून,
तुझ्यात हरवलेली मी…
Happy Valentines Day
 
प्रेम लग्न करणे किंवा एकमेकांसाठी
जीव देणे नाही तर एकमेकांचे न होताही
नेहमी एकमेकांसोबत राहणे एकमेकांना
आयुष्यभर साथ देणं.
Happy Valentines Day