शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. लव्ह स्टेशन
  3. व्हॅलेंटाईन डे
Written By
Last Updated : गुरूवार, 2 मार्च 2023 (16:34 IST)

Valentines Day 2023: घरी व्हॅलेंटाईन डे साजरा करणार असाल तर दिवस असा खास बनवा

दरवर्षी 14 फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो. व्हॅलेंटाईन डे हा प्रेमी युगुलांचा दिवस आहे. व्हॅलेंटाइन डेच्या दिवशी जोडपे एकमेकांसोबत वेळ घालवतात.  सहलीला जाण्याचा, डिनर डेटला जाण्याचा बेत आखतात.  परंतु कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रकरणांमुळे, जर आपण घरी व्हॅलेंटाइन डे साजरा करत असाल तर काही खास गोष्टी लक्षात ठेवा. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे व्हॅलेंटाइन डेच्या निमित्ताने घराची खास सजावट करणे. घराच्या सजावटीमुळे या  व्हॅलेंटाईन डे वर एक रोमँटिक वातावरण तयार करू शकता, जे पाहून  जोडीदारही आनंदी होईलच आणि आपला हा दिवस देखील खास होईल.चला तर मग सजावट कशी करावी जाणून घेऊ या.
 
1 लाल रंग प्रेमाचे प्रतीक आहे. अशा परिस्थितीत व्हॅलेंटाइन डेच्या दिवशी लाल रंगाला सजावटीचा भाग बनवा. व्हॅलेंटाइन डेच्या सजावटीत लाल रंगाचे फुगे वापरू शकता. फुगे हृदयाच्या आकाराचे असल्यास चांगले होईल. खोलीच्या छताला फुगे लटकवू शकता, आपल्याला हवे असल्यास फुगे जमिनीवर पसरवा.  लाल रंगाच्या रिबनने किंवा भिंतीच्या रंगाच्या अनुरूप अशा रंगाच्या रिबीन   लावून घर सजवू शकता. घर सजवण्यासाठी फुलांचाही वापर करता येतो.
 
2 घराचा प्रत्येक कोपरा प्रकाशाने उजळून टाका, घरातील सुंदर रोमँटिक सजावटीसाठी दिवे किंवा मेणबत्त्या वापरा. घरात पडलेल्या रिकाम्या बाटल्यांपासून लाईट डेकोरेशन करा. सुंदर दिव्यांनी  देखील प्रत्येक कोपरा प्रकाशित करू शकता. आपल्या खोलीत लाइट बारने भिंती उजळवू शकता.  इच्छा असल्यास, आपण विद्युत दिवे लावू शकता. पण विजेच्या वस्तूंचा वापर सावधगिरीने करा.
 
3 घराच्या दारात मेणबत्त्या सजवू शकता. गेटच्या बाजूला आणि आतल्या वाटेवर मेणबत्त्या लावून मार्ग बनवता येतो. जेव्हा मेणबत्त्यांपासून बनवलेला हा मार्ग संपतो तेव्हा आपण जोडीदाराला भेटवस्तू देऊन सरप्राईज देऊ शकता. मेणबत्तीच्या प्रकाशात  रात्रीच्या जेवणातही मेणबत्त्या वापरून कँडल लाईट डिनर करू शकता.
 
4 सुगंधित मेणबत्त्या खरेदी करा . त्यांना सजवून आपण घराला सुंदर दिसण्यासह छान सुगंधित वातावरण करू शकता. घराला फुलांनी सजवूनही  घराला छान सुगंध देऊ शकता. याशिवाय जोडीदाराच्या आवडीचे रूम फ्रेशनरही वापरू शकता.