1. लाईफस्टाईल
  2. »
  3. आरोग्य
  4. »
  5. आरोग्य लेख

'कोल्डड्रिंक'मुळे कॅन्सर होतो!

PR
PR
'कोल्डड्रिंक' अधिक प्रमाणात सेवन करणार्‍यांसाठी हे वृत्त म्हणजे धोक्याची घंटी आहे. 'कोल्डड्रिंक' प‍ित असाल तर सावधान! आठवड्यातून किमान दोन वेळा कोल्डड्रिंकचे सेवन करत असलेल्या व्यक्तीला 'पॅंक्रिएटिक कॅन्सर' (अग्नाशयाचा कॅन्सर) होण्याची शक्यता असते. असे एका संशोधनात सिध्द झाले आहे.

अमेरिकेतील मिनेसोटा यूनिवर्सिटीच्या काही शास्त्रज्ञांनी एक संशोधन केले. सिंगापूर येथील साठ हजारांपेक्षा अधिक पुरुष व महिलांवर त्यांनी सगल 14 वर्ष केलेल्या संशोधातून हा काढलेला निष्कर्ष आहे. कॅन्सर एपिडेमियोलोजी, बायोमार्कर्स अॅण्ड प्रिव्हेशन मॅग्झीनमध्ये हा निष्कर्ष प्रकाशित करण्‍यात आला आहे. आठवड्यात किमान दोन वेळा कोल्डड्रिंक पिणार्‍यांमध्ये 67 टक्के अग्नाशयाचा कॅन्सर अर्थात पॅंक्रिएटिक कॅन्सर होण्याची शक्यता असते.

शितपेय 'ब्लड शुगर' वाढवितात:
शित पेय आपल्या शरीरातील रक्तात साखरेचे प्रमाण वाढवित असतात. त्यामुळे आपल्या अग्नाशयावर ताण पडत असतो. अग्नाशयाचा कॅन्सर हा सगळ्यात धोकेदायक कॅन्सर प्रकारातील कॅन्सर आहे. प्रत‍ि वर्ष अशा प्रकारच्या कॅन्सरमुळे 7700 जणांवर मृत्यू ओढवला जातो.
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा