शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य लेख
Written By

बायकोचे ऐका, हृदयविकाराचा टाळा धोका

कॅलिफोर्निया विद्यापीठातील हृदयविकाराच्या संशोधिका नटारिया जोसेफ यांनी हृदयविकार कमी करण्यासाठी जगातल्या सगळ्या नवर्‍यांना एक चांगला सल्ला दिला आहे. हृदयविकारापासून दूर राहायचे असेल तर ऑफिसातून घरी आल्याबरोबर बायकोशी बोला आणि तिच्याशी सकारात्मक संवाद साधा. सकारात्मक संवादाचा मनावर आणि मेंदूवर चांगला परिणाम होतो. आपल्या मनातल्या भावना आणि विचार यांचा शरीरावर परिणाम होत असतो ही गोष्ट आता सर्वमान्य झाली आहे. सकारात्मक विचार मनात आले की, हृदय आणि मेंदू यामध्ये काही बदल घडतात. मानेकडून मेंदूकडे जाणार्‍या रक्तवाहिन्या नकारात्मक विचाराने जाड होतात आणि मेंदूला होणार्‍या रक्तप्रवाहात अडथळा येतो. त्याचा परिणाम हृदयविकारावर होतो. या उलट मनात सकारात्मक विचार आले तर ही रक्तवाहिनी जिला कॅरोटिड म्हणतात ती जाड होण्याचे टळते. म्हणूनच जे लोक सकारात्मक बोलतात, सकारात्मक विचार करतात त्यांची ही रक्तवाहिनी मऊ राहून मेंदूला चांगला रक्तपुरवठा होतो. याचा परिणाम म्हणून हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता 10 टक्क्याने कमी होते. नटारिया जोसेफ यांनी 281 मध्यमवयीन विवाहित पुरुषांच्या चाचण्या घेतल्या, तेव्हा असे आढळले की, अशा लोकांच्या मनातले नकारात्मक विचार प्रामुख्याने पत्नीशी होणार्‍या संवादातून वाढत असतात. मात्र पत्नीशी सकारात्मक संवाद होत असेल तर हा दोष टळतो.