शुक्रवार, 22 नोव्हेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By
Last Modified: गुरूवार, 26 नोव्हेंबर 2020 (10:12 IST)

पुरुषांना सर्वाधिक त्रास देणारे हे 5 आजार, तज्ज्ञांनी सांगितले समाधान

सध्याच्या काळात पुरुष ज्या आजारांना सर्वाधिक सामोरी जात आहे त्यांच्या बद्दल बोलताना तज्ज्ञ देखील त्यापासून वाचण्याचे उपाय सांगत आहेत. साधारणपणे रोगांची कोणतीही श्रेणी नसते. कोणते ही आजार कोणत्याही माणसाला आपल्या वेढ्यात अडकवू शकतात. कारण आता आजार तर वयाची मर्यादा सुद्धा ओलांडत आहे. म्हणजे जे आजार पूर्वी वृद्धापकाळात आणि वयाच्या 60 व्या वर्षांनंतर होत होते, ते आजकाल 22 ते 24 वयाच्या तरुणांमध्ये आढळून येत आहे. तज्ज्ञ सांगतात की सध्याच्या काळात पुरुष कोणत्या आजाराने सर्वाधिक त्रस्त आहेत.
 
* प्रथम क्रमांकावर येतंय ताण -
तज्ज्ञ सांगतात की ताण पुरुषांच्या मासिक आरोग्यालाच नव्हे तर त्यांच्या शारीरिक आरोग्यावर देखील परिणाम करत आहेत. आमच्या कडे येणाऱ्या बहुतेक रुग्णांमध्ये तणाव कमी किंवा जास्त प्रमाणात दिसून येत आहे. 
 
* नपुंसकत्व - 
तज्ज्ञ सांगतात की तणावामुळे बहुतेक पुरुषांना नपुंसकत्व या समस्याला सामोरी जावे लागत आहे. तर काही रुग्ण अशे देखील येत आहेत ज्यांना तणावामुळे जननेंद्रियात ताठरपणा नसल्याची समस्या येत आहे.
 
* रक्तदाबाची समस्या -
बीपी ची समस्या सामान्य होत आहे. 10 ते 15 वर्षांपूर्वी ही समस्या केवळ 40 वर्ष ओलांडलेल्या लोकांमध्येच आढळायची. पण आता किशोरवयीन मुले देखील या आजाराला सामोरी जात आहेत. एखाद्याला लो बीपीची समस्या असते तर एखाद्याला हाय बीपीची समस्या असते. 
 
तज्ज्ञांच्या मते रक्तदाबाशी निगडित समस्या अशी काही नाही की त्याला नियंत्रित केले जाऊ शकतं नाही. कमी वयातच योग्य आहाराने, शारीरिक हालचाली आणि मानसिक आरोग्याची काळजी घेतं असल्यास या आजारावर नियंत्रण मिळवता येऊ शकतं. तथापि करिअरच्या शर्यतीत आणि सामाजिक दबाव आल्याने पुरुषांमध्ये रक्तदाबाची समस्या कमी वयात बघायला मिळते. 
 
* प्रोस्टेटचे आजार - 
तज्ज्ञांच्या मते, पुरुषांमध्ये होणाऱ्या कर्करोगात प्रोस्टेटचा कर्करोग सर्वात जास्त आढळून येत आहे. तथापि हा कर्करोग हळू -हळू वाढतो आणि 
 
वेळेत याचे निदान झाल्यास, याचे पूर्णपणे निर्मूलन देखील केले जाऊ शकते. या साठी आवश्यक आहे की पुरुषांनी वयाच्या 45 वर्षानंतर वेळोवेळी प्रोस्टेट ग्रंथीची 
 
वैद्यकीय तपासणी करावी. चिकित्सकांना भेटून आपले संपूर्ण आरोग्याची तपासणी दर 6 महिन्यांनी करवावी. जर प्रोस्टेटच्या कर्करोगाचे सुरुवातीच्या काळातच असल्याचे निदान झाले असल्यास या कर्करोगाला मुळातून नष्ट करता येऊ शकतं.
 
* मधुमेह - 
झपाट्यानं मधुमेह वाढत आहे. तज्ज्ञ सांगतात की आपल्या समाजात मधुमेहाच्या रुग्णाची संख्या झपाट्याने वाढत आहे. पुरुषांमध्ये या आजाराचे प्रमाण झपाट्यानं वाढले आहे. कारण सर्वाधिक प्रकरणे टाईप -2 मधुमेहाची दिसून येत आहे तर या मुळे हे स्पष्ट आहेत की आपल्या जीवनशैलीत आलेल्या नकारात्मक बदलामुळे पुरुष झपाट्यानं मधुमेहाचे रुग्ण बनत चालले आहे. 
 
* या आजारापासून वाचण्यासाठी काय करावं - 
पुरुषांच्या समस्येबद्दल बोलताना तज्ज्ञ या समस्येपासून दूर राहण्याचे मार्ग देखील सुचवत आहे. त्यांच्या मतानुसार मधुमेहाच्या वेळ्ख्यातुन लांब राहण्यासाठी सर्वात आधी महत्त्वाचे आहे की आपण आपल्या जीवनशैलीशी साजेशी आहार घ्यावा.आपल्या कामाचे स्वरूप बसण्याचे असल्यास, आपण स्टार्च आणि नैसर्गिक गोडवा असलेल्या पदार्थांना आपल्या आहारा पासून लांब ठेवावं. जसे की तांदूळ, बटाटे, गव्हाच्या पिठाच्या पोळ्या याचे सेवन मर्यादित करावे. तज्ज्ञ सांगतात की जर आपल्याला मधुमेहाने वेढले आहे आणि आपल्या कौटुंबिक इतिहासात मधुमेह असल्यास एकावेळी 2 पेक्षा जास्त 
 
गव्हाच्या पोळ्या खाऊ नये- 
कारण गव्हामध्ये नैसर्गिक साखर असते. तसेच कार्बोहायड्रेट देखील मुबलक प्रमाणात असते. या कारणास्तव हे शरीरात जाऊन झपाट्यानं रक्तातील साखर वाढविण्याचे कार्य करतं. या परिस्थितीशी वाचण्यासाठी आपण अन्नाला एकाच बैठकीत अधिक प्रमाणात खाण्याऐवजी कमी कमी वेळा घ्यावे. 
 
* एवढं चालणं देखील पुरेशे आहेत - 
तज्ज्ञ सांगतात की काही लोकांना जिमखान्यात जाऊन व्यायाम करणे आवडत नाही. तर कोणाला योगा करणं कमी आवडत. अशा परिस्थितीत चालणे म्हणजे वॉक करणे अशी क्रिया आहे जी बऱ्याच लोकांना आवडते आणि खूप प्रभावी असते. 
 
जर आपण घरातून निघून 2 किमी चालत आला आणि तेवढेच चालत परत घरी गेला तर आपल्याला कोणतेही व्यायाम करण्याची आवश्यकता वाटणार नाही. कारण वॉक हे आपल्या शरीरातील सुमारे 80 टक्के स्नायूंचा व्यायाम करतात. जे लोक लवकर थकतात, त्यांनी आपल्या दिवसाची सुरुवात अशा प्रकारे करावी.

तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार, आरोग्यवर्धक जीवन जगण्यासाठी पुरुषांनी वेळोवेळी आपल्या आरोग्याची तपासणी करावी. पुरुषांनी 45 वर्षाच्या नंतर संपूर्ण आरोग्याची तपासणी सुरू करायला हवी आणि वयाच्या 50शी नंतर मूत्राशयाचे आरोग्य राखून अल्ट्रासाउंड करायला हवे.