मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By
Last Modified: मंगळवार, 16 ऑक्टोबर 2018 (00:15 IST)

सफरचंदचे सेवन करा आणि दृष्टीदोष दूर करा

स्मरणशक्ती, दुबर्लता तसेच दृष्टीदोष दूर करण्यासाठी निसर्गाची देणगी असलेले लालबुंद सफरचंद आपल्या आरोग्य रक्षकाची भूमिका बजावत असते. आजारी व्यक्तीला प्रतिदिन एक सफारचंद खायला दिल्याने त्याची रोगप्रतिकारक शक्ती वाढून त्याला काही दिवसातच बरे वाटते. तसेच अशक्तपणा आल्यानंतर दररोज सकाळ- सध्याकाळ कच्च्या सफरचंदची भाजी व पोळी खायला द्यावी. अशक्तपणा कमी होऊन ताजेतवाने वाटते. 
 
संध्याकाळी एक ग्लास सफरचंदची ज्यूस व रात्री आख्ये सफरचंद रोग्याला दिल्याने त्याची भूक शमली जाते. 
 
साधारणी महिनाभर सफरचंद खालल्याने स्नायूंना बळकटी येऊन दूर्बलता कमी होते. दृष्टीदोष असल्यास ताज्या सफरचंदच्या गोल- गोल चकत्या करून दोन्ही डोळ्यांवर बांधाव्यात. त्याने डोळ्यामधील जळजळ कमी होऊन दृष्टी तेज होते. 
 
दररोजच्या आहारात लोणी व ताजे सफरचंद समावेश असल्याने अनेक आजार बरे होतात. जुलाब, लघवीबाबत आजार नाहीसे होतात. त्वचेमधील कोरडेपणा नाहीसा होतो.