रविवार, 5 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By
Last Modified: शुक्रवार, 3 जानेवारी 2025 (14:42 IST)

Bones Sound हाडातून येत असेल आवाज तर हे पदार्थ खाणे सुरु करा

joints
Bones Sound अलीकडे लोक अनहेल्दी फूड खात असल्याने कमी वयातच लोकांच्या शरीरात न्यूट्रिशनची कमतरता दिसून येत आहे. कॅल्शियम, व्हिटामिन D आणि आवश्यक मिनरल्सच्या कमतरतेमुळे हाडांशी संबंधित आजार वाढू लागले आहे. यापैकी एक म्हणजे हाडाच्या सांध्यामधून कट-कट असा आवाज. जरी यामुळे वेदना होत नसल्या तरी, तरीही ते हलके घेण्याची गरज नाही.
हाडातून अनेकदा कट-कट असा आवाज येणे गंभीर आजाराचे संकेत असू शकतात. या प्रकारचा आवाज बहुतेक गुडघ्यांमधून ऐकू येतो. ज्याला क्रेपिटस म्हणतात. हा एक प्रकारचा संधिवात आहे ज्यामध्ये वाढत्या वयात गुडघ्यांमधील लवचिक ऊतक कमी होते, ज्यामुळे टोके एकमेकांवर घासतात. या वेळी हाडांमधून 'कट-कट' असा आवाज येतो.
 
ज्वाइंट्समधून जर कट-कट असा आवाज येतो किंवा आपल्या मान, बोट मोडण्याची सवय आहे तर या ज्वाइंट्समधून निघणार्‍या कट-कट हा आवाज एयर बबल्स मुळे येतो. जे प्रत्यक्षात दोन हाडांच्या सांध्यावर हवेचे फुगे बनतात. ते तुटल्यावर हा आवाज ऐकू येतो. यामुळे शरीराला काही त्रास होत नसेल तर घाबरण्याची गरज नाही. तुमची दिनचर्या बदलून आणि तुमच्या आहारात काही गोष्टींचा समावेश करून तुम्ही यापासून आराम मिळवू शकता. दररोज व्यायाम करणे फायदेशीर ठरेल.
यासाठी आहारात काही पदार्थ सामील करायला हवे. सर्वप्रथम कॅल्शियम समृद्ध असलेल्या गोष्टी खा, ज्यामुळे हवेचे फुगे तयार होण्याची समस्या कमी होईल. दुधात हळद घालून प्यायल्याने त्यामध्ये पुरेसे कॅल्शियम मिळेल. गूळ आणि भाजलेले हरभरे खाल्ल्याने कॅल्शियमही मिळते आणि सांधे मजबूत होतात. रिकाम्या पोटी अक्रोड खाणे देखील फायदेशीर ठरेल. याशिवाय तुम्ही भिजवलेले बदामही खाऊ शकता. गुडघ्यावरील कूर्चा झीज झाल्यामुळे कर्कश आवाज येत असल्यास, आपल्या शरीराला व्हिटॅमिन सी आवश्यक आहे. यासाठी पालक, संत्री, ब्रोकोली, लिंबू खाणे फायदेशीर ठरेल.
 
अस्वीकारण: ही माहिती सामान्य समजुतीवर आधारित असून केवळ माहितीसाठी दिली जात आहे. वेबदुनिया याला दुजोरा देत नाही. कोणतेही उपाय करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घ्या.