बुधवार, 1 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By
Last Modified: गुरूवार, 25 एप्रिल 2024 (16:45 IST)

वजन कमी करण्यासाठी फायदेशीर आहे ब्राऊन राईस, जाणून घ्या फायदे

brown rice
वजन कमी करण्यासाठी आपण नेहमी वेगवगेळे डाईट प्लॅन करतो. अशामध्ये ब्राऊन राईस हे एक असे फूड आहे जे वजन कमी करण्यासाठी मदत करते. ब्राऊन राईस वाईट राईसचा एक आरोग्यदायी पर्याय आहे जो फायबर, व्हिटॅमिन आणि मिनरल्सने परिपूर्ण आहे. या लेखात आपण जाऊन घेणार आहोत की ब्राऊन राईस वजन कमी करण्यासाठी किती फायदेशीर आहे. 
 
ब्राऊन राईस वाईट रेसचा एक अपरिष्कृत रूप आहे. वाईट राईस बनवण्यासाठी तांदळाच्या दाण्यावरून त्याचे वरील भाग काढला जातो ज्यामुळे तांदळाचे पोषकतत्वे कमी होतात. पण ब्राऊन राईस पोषक तत्वांनी परिपूर्ण असतो. 
 
ब्राऊन राईस मध्ये असलेले पोषकतत्व 
1. कार्बोहायड्रेड- ब्राऊन राईसचा मुख्य पोषक तत्व कार्बोहायड्रेट आहे. यामध्ये असलेले कार्बोहायड्रेट कॉंम्प्लेक्स असतात जे शरीराला हळू हळू ऊर्जा प्रदान करतात. 
 
2. फायबर- ब्राऊन राईस फायबरचा एक चांगला स्रोत आहे. फायबर पाचन तंत्राला सुरळीत ठेवते. 
 
3. प्रोटीन- ब्राऊन राईसमध्ये प्रोटीनचे प्रमाण भरपूर असते. प्रोटीन स्नायूंची निर्मिती आणि सुधारणा करण्यासाठी मदत करते. 
 
4. व्हिटॅमिन आणि मिनरल्स- ब्राऊन राईस मध्ये अनेक व्हिटॅमिन आणि मिनरल्स असतात. ज्यामध्ये व्हिटॅमिन B, मॅग्नेशियम, फास्फोरस आणि मॅगनीज असते. 
 
वजन कमी करण्यासाठी ब्राऊन राईसचे फायदे
1. ब्राऊन राईस मध्ये वाईट राईसच्या तुलनेत कॅलरी कमी प्रमाणात असते. एक कप शिजवलेल्या ब्राऊन राईसमध्ये 216 कॅलरी असतात  तर एक कप शिजवलेल्या वाईट राईसमध्ये 242 कॅलरीज असतात. 
 
2. ब्राऊन राईस फायबरचा चांगला स्रोत आहे. फायबर पाचन तंत्राला आरोग्यदायी ठेवते. तसेच वजन करण्यासाठी मदत होते.  
 
3. ब्राऊन राईसमध्ये असलेले कॉंम्प्लेक्स कार्बोहायड्रेस्ट शरीरात हळू हळू पचतात. ज्यामुळे रक्तचापचा सत्र अचानक वाढत नाही. ज्यामुळे वजन कमी करण्यास मदत मिळते. 
 
4. ब्राऊन राईस मध्ये असलेले पोषक तत्वे मेटाबॉलजीम वाढवण्यासाठी मदत करतात. व वजन कमी होण्यास मदत होते. 
 
5. ब्राऊन राईसमध्ये असलेले फायबर पोटाची चरबी कमी करण्यासाठी मदत करतात. तसेच वजन कमी होण्यास मदत होते. 
 
ब्राऊन राईस खाण्यापूर्वी या गोष्टी ठेवाव्या लक्षात 
*ब्राऊन राईस वाईट राईस पेक्षा जास्त चावून खाऊ शकतो. 
*ब्राऊन राईसला हळू हळू आपल्या डाएटमध्ये सहभागी करू शकतात. 
*ब्राऊन राईस शिजवायला अधिक वेळ लागतो. 
*ब्राऊन राईस शिजवण्यापूर्वी चांगल्या प्रकारे धुवून घ्यावा. 
*ब्राऊन राईस एयर टाईट कंटेनर मध्ये स्टोर करून ठेवावा. 
 
ब्राऊन राईस वजन कमी करण्यासाठी एक हेल्दी आणि प्रभावी विकल्प आहे. हे फायबर, व्हिटॅमिन, आणि मिनरल्सने भरपूर असतो. यामुळे शरीर आरोग्यदायी राहते व वजन कमी करण्यास मदत मिळते. 
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

Edited By- Dhanashri Naik