शुक्रवार, 3 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By
Last Modified: शुक्रवार, 24 जुलै 2020 (12:23 IST)

कोविड -19 ने बरं झालेल्या एखाद्या माणसाला भेटावयास कधी जावं आणि त्यासाठी कोणती खबरदारी घ्यावी, जाणून घेऊ या Expert Advice .....

कोरोना व्हायरस टाळण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहे. या संसर्गाच्या संदर्भात लोकांच्या मनात अनेक प्रकाराचे प्रश्न उद्भवतात. जसे की कोविड -19  या आजाराने बरं झालेल्या एखाद्या व्यक्तीला भेटावयास कधी जावं, कोणती काळजी घेणे आवश्यक आहे, कोणती खबरदारी घ्यावी. हे अनेक प्रश्न डोळ्यासमोर ठेवून आम्ही डॉ.आलोक वर्मा (MBBS MD) यांचाशी संवाद साधला. चला जाणून घेऊ या.
 
आज ज्या प्रकारे कोविड-19 चे औषधोपचार उपलब्ध नाही तरी हे सांगणे कठीण आहे की या आजारापासून ग्रस्त असलेली व्यक्ती पूर्णपणे बरं होऊन आपले सामान्य जीवन कधीपासून सुरु करू शकेल? बहुतेक जणांचा मनात हा प्रश्न आवर्जून येतो की कोरोनाने बरा झालेला व्यक्ती आपले सामाजिक आणि व्यावसायिक क्रियाकलापांचा प्रारंभ कधीपासून करू शकतो. 6 महिन्यांच्या अनुभवाच्या आधारे असे म्हटले जाऊ शकते या पुढील गोष्टींवर हे अवलंबून असतं.
 
* संसर्ग झालेल्या व्यक्तीमध्ये कोणत्या प्रकाराचे लक्षण होते?
* त्या व्यक्तीच्या किती आणि कोणत्या अवयवांवर कश्या प्रकारे प्रभाव होता?
* रुग्णाचा RTPCR अहवाल नकारात्मक कधी आला?
* रुग्णात IGG अँटीबॉडीज बनल्या आहेत किंवा नाही?
 
सामान्यपणे प्रत्येक संसर्ग असलेल्या व्यक्तीच्या शरीरात कोरोनाचा अँटीजेन किंवा RT PCR नकारात्मक होण्यासाठी 28 दिवसांचा वेळ लागतो, तर अश्या रुग्णांमध्ये 14 ते 28 दिवसामध्ये IGG अँटीबॉडीज विकसित होतात.
 
सामान्य किंवा वरील परिस्थितीत जेव्हा अँटीजेन किंवा RT PCR चाचणी नकारात्मक होते तरी पण रुग्णाला पुढील 14 दिवस घरी राहण्याचा आणि पूर्णपणे निरोगी होण्याचा सल्ला दिला जातो.
 
आता ते लोकं ज्यांना कोणत्याही प्रकाराचे गांभीर्य किंवा अवयवांवर परिणाम झाला नाही, ते 6 आठवड्यानंतर सामान्यरीत्या सामाजिक आणि व्यावसायिक कार्यकलाप सुरू करू शकतात. जे लोकं गंभीररीत्या आजारी आहेत किंवा ज्यांचा फुफ्फुस, मूत्रपिंड, हृदय किंवा इतर अवयवांवर जास्त प्रभाव आहे, त्यांना सामान्य होण्यास जास्त वेळ लागतो. या रुग्णांना नेहमीच आपल्या डॉक्टर च्या संपर्कात राहावं.
 
काही संसर्ग असलेल्या व्यक्तींमध्ये पुन्हा हे संसर्ग होण्याची दाट शक्यता असते म्हणून पूर्णपणे निरोगी झाल्यावर देखील मास्कचा नेमाने वापर, सामाजिक अंतर राखणे आणि त्याचबरोबर हातांना वेळोवेळी सेनेटाईझ करत राहावं.
 
चला आता जाणून घेऊ या की कोविड -19 मधून बरं झालेल्या व्यक्तीला भेटावयास जाताना कोण कोणत्या गोष्टी लक्षात असू द्यावा?
 
* कोविड 19 मधून बरं झालेल्या रुग्णाला भेटायला जाण्याआधी हे लक्षात ठेवा की ती व्यक्ती त्या आजाराने पूर्णपणे बरी झाली आहे.
* त्या व्यक्तीशी भेटताना योग्य अंतर राखावं. सामाजिक अंतर कायद्याचे अनुसरणं करा.
* मास्क वापरणे विसरू नये. लक्षात ठेवा की आपण बीना मास्कचा कोणाच्याही संपर्कात येऊ नका.
* कोविड -19 च्या व्यक्तीला भेटावयास जाण्यापूर्वी त्या रुग्णाचा RT PCR चा अहवाल नकारात्मक असणे फार महत्त्वाचे आहे.