बुधवार, 22 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By
Last Modified: शुक्रवार, 11 ऑगस्ट 2023 (09:04 IST)

Fruit peels are also nutritious फळांची सालीदेखील असतात पोषक

Fruit peels are also nutritious फळ पोषक असून आरोग्यासाठी तर चांगले असतातचं पण सौंदर्यासाठी ही फायदेशीर असतात. केवळ फळचं नव्हे तर फळांची सालांमध्येही पोषक तत्त्वांची भरमार असती.
 
संत्र्यांची साले
वजन कमी करण्यात संत्र्याची साले फायदेशीर आहे. त्वचेसाठी हे नॅचरल स्क्रबर आणि ब्लीचप्रमाणे उपयुक्त आहे. त्या शिवाय यामुळे श्वसनसंबंधी आजार आणि कब्जही दूर होते. याने छातीची जळजळदेखील कमी होण्यास मदत मिळते.
 
केळीची साली  
केळीच्या सालीचा आतला भाग दांतावर घासण्याने दात नैसर्गिकरूपाने पांढरे शुभ्र होतात. स्किन जळल्यास त्यावर केळीचं साल ठेवल्याने गार वाटतं. टाच फाटली असल्यास त्यावर केळीची साल घासल्याने एका आठवड्यात आराम मिळतो.

कलिंगडाचे टरफल
कलिंगडामधील पांढरा भाग वजन कमी करण्यात मदतगार ठरतो. याला स्किनवर रगडण्याने धूळकण साफ होतात आणि हे त्वचेच्या इतर तक्रारीपासून दूर ठेवतात.