गुरूवार, 14 ऑगस्ट 2025
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By
Last Modified: बुधवार, 21 ऑगस्ट 2024 (07:37 IST)

कापूर केवळ पूजेसाठी नव्हे तर या प्रकारे देखील वापरु शकता, अनेक आरोग्यदायी फायदे मिळतील

Health Benefits of Camphor
हिंदू घरांमध्ये पुजेच्या विधींमध्ये आरतीच्या वेळी वापरल्या जाणार्‍या कापराचे आरोग्यासाठी देखील खूप फायदे आहेत-
 
कापूर आरोग्यासाठी फायदेशीर
कापूर हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आणि प्रभावी मानले जाते, त्यात अनेक औषधी गुणधर्म आणि अँटीऑक्सिडंट्स आढळतात ज्यामुळे आरोग्याला फायदा होतो. आयुर्वेदातही कापूरने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. जाणून घ्या तुम्ही कापूर कसा वापरू शकता.
 
ऑक्सिजनची पातळी संतुलित राहते
जर एखाद्याला ऑक्सिजनची कमतरता जाणवत असेल तर त्याला कापूरचा वास घेऊ द्या, असे केल्याने शरीरातील ऑक्सिजनची पातळी संतुलित राहील. जर तुम्हाला घरामध्ये गुदमरण्याची समस्या येत असेल तर 2-3 कापूरच्या गोळ्या जाळून घरात फिरवा.
 
कोंड्याची समस्या दूर होते
केसांमध्ये कोंड्याची समस्या असल्यास कापूर बारीक करून त्यात खोबरेल तेल मिसळा आणि हे मिश्रण केसांच्या मुळांवर पूर्णपणे लावा. असे रोज केल्याने कोंड्याची समस्या कमी होते.
 
सर्दी आणि खोकल्यापासून मुक्ती
सर्दी आणि खोकल्यामध्येही कापूर फायदेशीर आहे, यासाठी गरम पाण्यात कापूर मिसळून त्या पाण्याची वाफ घ्यावी. कापूरच्या वाफेने सर्दी-खोकला निर्माण करणारे जंतू नष्ट होतात.
 
त्वचेच्या संसर्गापासून आराम मिळतो
जर तुम्हाला त्वचेची ऍलर्जी, खाज सुटणे किंवा शरीरावर पुरळ उठत असेल तर खोबरेल तेल आणि कापूर एकत्र करून त्या भागावर लावा. यामुळे त्वचेवरील जळजळीपासून आराम मिळेल आणि वेदनाही कमी होतील. संसर्गास कारणीभूत असलेले बॅक्टेरिया देखील मरतात.
 
सूज कमी होण्यास मदत होते
जर काही कारणास्तव तुमच्या पायांना सूज येत असेल तर यासाठी तुम्ही गरम पाण्यात कापूर आणि मीठ मिसळा आणि काही वेळ या पाण्यात पाय ठेवा. हे सूज आणि वेदना कमी करण्यास मदत करेल. याच्या मदतीने मज्जातंतूंच्या दुखण्यापासून आराम मिळू शकतो.
 
अस्वीकारण: ही माहिती सामान्य उपायांवर अवलंबून असून केवळ माहितीसाठी दिली जात आहे. वेबदुनिया याला दुजोरा देत नाही. कोणतेही उपाय अमलात आणण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घ्या.