मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By
Last Modified: सोमवार, 17 ऑगस्ट 2020 (09:08 IST)

Health Benefits Of Eating Sambar : गरम सांबाराचे आरोग्यदायी फायदे आणि त्याला बनवायची विधी जाणून घेऊ या....

सांबार आता निव्वळ दक्षिण भारतीयांचा अन्नाचा एक हिस्सा नव्हे तर जगभरात प्रसिद्ध आहे. हे चविष्टच नसून आरोग्यास देखील फायदेशीर आहे, जे आपणांस निरोगी ठेवण्यास मदत करतं. बहुतेक आहारतज्ज्ञ देखील इडली सांबार खाण्याचा सल्ला देतात, कारण हा अनेक आरोग्यविषयक फायद्यांचा खजिना आहे. तर जाणून घेऊ या गरम सांबराचे आरोग्यदायी फायदे आणि बनविण्याची पद्धत -
 
सर्वात आधी जाणून घेऊ या सांबराचे आरोग्यदायी फायदे-
 
सांबार प्रोटीन समृद्ध आहारामध्ये समाविष्ट केले जाते, कारण या मध्येडाळ चांगल्या प्रमाणात असते, जी प्रथिनांनी समृद्ध असते. हे हाडे, स्नायू आणि त्वचेला निरोगी ठेवण्यास मदत करतं. आणि शरीराला निरोगी ठेवतं.
 
सांबार बनविण्यासाठी या मध्ये बऱ्याच प्रकाराच्या भाज्या घातल्या जातात. या फायबरने समृद्ध असतात, जे वजनाला नियंत्रित ठेवण्यास मदत करतात, कारण सांबाराने पोट देखील भरलेले राहते  आणि बऱ्याचकाळापर्यंत भुकेची जाणीव होत नाही. जर आपणांस वजन कमी करावयाचे असल्यास सांबाराला आपल्या आहारामध्ये समाविष्ट करावं.
 
सांबार पचक प्रणालीला सुरळीत ठेवण्यास मदत करतं. पोटाशी निगडित समस्या असल्यास, आराम देतं. बद्धकोष्ठतेसारख्या समस्यांपासून मुक्त करतं.
 
सांबार शरीरास डिटॉक्स(शुद्धी) करण्यात मदत करतं. यामध्ये असलेले डाळ, भाज्या, मसाले, शरीरास डिटॉक्स करण्यास मदत करतं. या व्यतिरिक्त हे रोग प्रतिकारक शक्ती बळकट करते.
 
सांबार बनविण्याची पद्धत -
 
तूर डाळ स्वच्छ करून धुऊन घ्या.
 
कुकर मध्ये गरजेपुरती पाणी टाकून त्यामध्ये डाळ, थोडंसं तूप, चवीप्रमाणे मीठ, हळद, लाल तिखट आणि चिंचेचे पाणी टाकून शिजवायला ठेवावं.
 
आता त्या भाज्या घ्या, ज्या सांबार मध्ये घालावयाचा आहे, जसे की बटाटे, टमाटे, गाजर, वांगी, शेवगाच्या शेंगा, दुधी इत्यादी. या चांगल्या प्रकारे धुऊन चिरून घ्या.
 
एका कढईत तेल टाका. तेल गरम झाल्यावर त्यामध्ये कांदा, थोडं मीठ, हळद आणि सांबार मसाला टाकून भाज्या शिजवून घ्या.
 
भाज्या व्यवस्थित शिजल्यावर त्यात डाळ घाला आणि चांगल्या प्रकारे मिसळा.
 
फोडणीसाठी साहित्य -
 
एका कढईत तूप घ्या. तूप गरम झाल्यावर यात अक्खी लाल मिरची, कढी पत्ता, मोहरी, जिरं, लसणाच्या पाकळ्या आणि हिंग टाकून चांगल्या प्रकारे फ्राय करून डाळ आणि भाज्या टाकून झाकून ठेवा. एक उकळी आल्यावर गॅस बंद करून द्या. पौष्टिक सांबार तयार आहे.