मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By
Last Modified: बुधवार, 4 मे 2022 (21:38 IST)

Health Tips : या 5 चुकांमुळे कोरोना संक्रमित होऊ शकता

देशात कोरोनाचा कहर पुन्हा डॉक्टरांपासून सर्वसामान्य नागरिकांसाठी चिंतेचा विषय बनला आहे. एकीकडे काही काळापर्यंत देशातील कोरोना कमकुवत होताना दिसत असतानाच दुसरीकडे सध्या दररोज कोरोनाचे अनेक रुग्ण समोर येत आहेत. ती चिंतेची बाब आहे.कोरोनाला सहज घेऊ नका. या 5 चुकांमुळे तुम्ही कोरोना संक्रमित होऊ शकता .या चुका करू नका- 
 
1 लस न घेणे -अनेकांनी अद्याप लसीचा डोस घेतलेला नाही. अशा परिस्थितीत जर तुम्हाला कोरोनापासून स्वतःला वाचवायचे असेल तर त्यासाठी तुम्हाला कोरोनाची लस नक्कीच घेणे आवश्यक आहे. भारतात लसीकरण मोहीम सातत्याने सुरू आहे. कोरोनासाठी लस पूर्णपणे प्रभावी आणि सुरक्षित असल्याचे सांगितले आहे.  
 
2 बूस्टर डोसपासून दूर राहणे-  देशातील 18 आणि 40 पेक्षा जास्त वयोगटातील लोकांसाठी बूस्टर डोस देखील सुरू झाला आहे. तर, बूस्टर डोसकडेही बरेच लोक दुर्लक्ष करताना दिसतात. म्हणूनच, ज्या लोकांनी 9 महिन्यांपासून लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत, त्यांनी देखील बूस्टर डोस घेणे आवश्यक आहे.
 
3 मास्कचा वापर न करणे- सध्या कोरोनाचे निर्बंध काढण्यात आले आहे. अनेकांनी मास्क लावणे सोडले आहे. कोरोनापासून वाचण्यासाठी प्रत्येकाने मास्क घालणे आवश्यक आहे. ऑफिसमध्ये, प्रवासात, घराबाहेर इत्यादीमध्ये तुम्ही मास्क लावलाच पाहिजे. स्वतः मास्क घाला आणि इतरांनाही मास्क घालण्यास सांगा. तुम्ही सर्जिकल मास्क किंवा कापडाचा मास्क घालू शकता. डबल मास्किंग देखील एक चांगला पर्याय आहे.
 
4 हात न धुणे- बरेच लोक हाताची स्वच्छता पूर्णपणे विसरले आहेत. पण कोरोनावर मात करण्यासाठी वेळोवेळी हात स्वच्छ करत राहायला हवे. आपण आपले हात साबण आणि पाण्याने 20 मिनिटे धुवावेत. तसेच,सॅनिटायझर चा वापर देखील करावा.
 
5 सामाजिक अंतर न राखणे- सध्या जवळपास कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने लावण्यात आलेले निर्बंध काढण्यात आले असून ऑफिस, शाळा, मॉल, बाजारपेठे, सिनेमागृह ,नाट्यगृह उघडण्यात आले आहे. अशा परिस्थितीत लोकांना संसर्ग होण्याचा धोका जास्त असतो. म्हणूनच तुम्ही सामाजिक अंतर राखणे महत्त्वाचे आहे. ऑफिस, शॉपिंग मॉल इत्यादी ठिकाणी गर्दीचा भाग बनू नका आणि शक्यतो विनाकारण घराबाहेर पडू नका.