शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By
Last Modified: मंगळवार, 5 जानेवारी 2021 (09:12 IST)

पोटात जडपणा जाणवतो, हे घरगुती उपाय त्वरित आराम देतील

बऱ्याच प्रकाराचे आजार आपल्याला वेढतात. कधी ताप,तर कधी मधुमेहासारखे आजार त्रास देतात. परंतु आपणास माहित आहे का, की या सर्व आजारांची सुरुवात पोटापासूनच सुरू होते, कारण असे म्हणतात की जर आपले पोट स्वच्छ नाही तर आपण आजारांना बळी पडू शकता. अशा परिस्थितीत बऱ्याच वेळा जास्त प्रमाणात खाल्ल्यावर पोटात जडपणा जाणवतो. आणि त्यामुळे आळस, अस्वस्थता आणि झोप न येणे सारखे त्रास उद्भवतात. आम्ही सांगत आहोत या साठी काही घरगुती उपाय, ज्यांना अवलंबवल्याने काही मदत होऊ शकते.
 
* पोटाच्या जडपणाला दूर करण्यात मध आपली मदत करतो. दररोज जेवण झाल्यावर एक चमचा मध खाल्ल्याने पोटफुगी सारख्या त्रासांमध्ये आराम मिळतो. या शिवाय दररोज किमान आठ ते दहा ग्लास पाणी प्यायल्याने पचन तंत्र चांगल्या प्रकारे काम करतो, ज्यामुळे पोट फुगी सारखे त्रास होत नाही. पोट स्वच्छ झाल्यामुळे आंतड्या देखील चांगल्या प्रकारे काम करतात आणि शरीराला बऱ्याच रोगांपासून वाचविण्यात मदत करतात.
 
* पोटात जडपणा वाटत असेल तर वेलची खावी. या मुळे फायदा होतो. आपल्याला फक्त हेच करायचे आहे की नियमितपणे दररोज जेवण केल्यावर दोन वेलची चावून खायची आहे. या शिवाय बडीशोप आणि खडी साखर देखील पोटाच्या जडपणाला दूर करण्यात फायदेशीर आहे. ह्याचे सेवन केल्याने तोंडातून येणारा वास देखील दूर होऊन पोटाच्या त्रासातून आराम मिळतो.
 
* आपण जे काही तळलेले किंवा मसालेदार अन्न खातो किंवा तळलेल्या हिरव्या  मिरची चे जास्त प्रमाणात सेवन करतो, तरी ही पोटात जळजळ होते, ज्यामुळे पोटात जडपणा जाणवतो म्हणून अशा अन्नापासून लांब राहणेच योग्य आहे.या शिवाय रात्री जेवल्यानंतर आणि सकाळी वॉक करणे देखील फायदेशीर आहे. असं केल्याने पचन तंत्र बळकट होत आणि अन्न पचन लवकर होत, ज्या मुळे पोटात जडपणाच्या त्रासापासून आराम मिळतो.
 
* आळशीचे सेवन करणं आपल्या आरोग्यासाठी खूप चांगले मानले जाते. ह्याचे सेवन केल्याने न केवळ पोटचं स्वच्छ होतो तर पोटाच्या जडपणात देखील आराम मिळतो. दररोज आपण आळशी भिजत घालून ह्याचे सेवन रात्री जेवल्यानंतर करू शकता. चहा,कॉफी चे सेवन देखील जास्त करू नये, कारण हे गरम प्रकृतीचे आहे या मुळे पोटात जळजळ होते आणि पोटात जडपणा जाणवतो.