रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By
Last Modified: सोमवार, 9 ऑक्टोबर 2023 (15:45 IST)

Almonds For Weight Loss वजन कमी करण्यासाठी बदाम

Almonds
Almonds For Weight Loss जेव्हा जेव्हा वजन कमी करण्याचा प्रश्न येतो तेव्हा अनेक लोक बर्‍याचदा सुखे मेवे खाणे टाळतात. कारण यात फॅट आणि कॅलरीज खूप जास्त असतात. पण तुम्हाला माहित आहे का की काही नट्स आहेत जे वजन कमी करण्यात मदत करतात. या बदामाचाही समावेश आहे. होय, बदाम वजन कमी करण्यास मदत करू शकतात. याचे योग्य सेवन केल्यास वजन कमी होण्यास तसेच पोटावरील चरबी कमी करण्यास मदत होते. चला तर मग जाणून घेऊया वजन कमी करण्यासाठी बदाम कसे फायदेशीर ठरू शकतात?
 
वजन कमी करण्यास बदाम कशाप्रकारे फायद्याचे ? 
बदाम अनेक पोषक तत्वांनी समृद्ध आहे, म्हणून ते एक सुपरफूड मानले जाते. यामध्ये फायबर आणि हेल्दी फॅट्स मुबलक प्रमाणात आढळतात, ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. हे खाल्ल्याने पोट दीर्घकाळ भरलेले राहते. हे तुमची भूक शांत करते आणि तुम्हाला जास्त खाण्यापासून प्रतिबंधित करते. बदामामध्ये उच्च प्रथिने असतात, जे स्नायू तयार करण्यास मदत करतात. बदामाचे नियमित सेवन केल्याने शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल आणि पोटावरील चरबी कमी होऊ शकते.
 
वजन कमी करण्यासाठी बदाम कसे खावे?- 
सकाळी भिजवलेले बदाम खा
वजन कमी करण्यासाठी तुम्ही दररोज सकाळी रिकाम्या पोटी भिजवलेले बदाम खाऊ शकता. भिजवलेले बदाम खाल्ल्याने वजन कमी होण्यास मदत होतेच शिवाय इतरही अनेक आरोग्य फायदे मिळतात.
 
बदाम पावडर
वजन कम करण्यासाठी बदाम पावडर डायटमध्ये सामील करु शकतात. बदाम पावडर लापशी किंवा दुधात मिसळून खाऊ शकता. वजन कमी करण्यासाठी त्याचे सेवन फायदेशीर ठरेल. याशिवाय शरीराला पुरेसे पोषण आणि ऊर्जाही मिळेल.
 
शेक किंवा स्मूदी मध्ये मिसळून खावे बदाम
जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर तुम्ही बदाम शेक किंवा स्मूदीमध्ये मिसळून खाऊ शकता. हे स्वादिष्ट असण्यासोबतच वजन कमी करण्यातही मदत करू शकते.
 
स्नॅक्स म्हणून बदाम खा
वजन कमी करण्यासाठी तुम्ही स्नॅक म्हणून बदाम देखील खाऊ शकता. बदामामध्ये हेल्दी फॅट्स आणि अँटिऑक्सिडंट्स असतात, जे चयापचय वाढवण्यास मदत करतात. वजन कमी करण्यासाठी हे खूप फायदेशीर आहे.
 
बदामाचे दूध प्या
वजन कमी करण्यासाठी तुम्ही नाश्त्यात बदामाचे दूध पिऊ शकता. यामुळे तुमच्या शरीराला दुप्पट पोषण मिळेल आणि भूकही नियंत्रणात राहील.
 
वजन कमी करण्यासाठी आपण याप्रकारे बदामाचे सेवन करु शकतात. तथापि जर तुम्हाला कोणत्याही आजार किंवा समस्येचा सामना करावा लागत असेल तर ते सेवन करण्यापूर्वी आरोग्य तज्ञाचा सल्ला जरूर घ्या.