1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By

झोप येत नाही का, हे पाच उपाय अवलंबवा

What to do to sleep early at night
अनेक लोकांना रात्री खूप वेळ होऊन जातो तरी झोप येत नाही. जर हा आजार वाढला तर ब्रेन स्ट्रोकचा धोका वाढू शकतो. झोप न येण्याचे अनेक कारणे असतात. जसे की तणाव, उदासीनता, कैफीन, निकोटिन आणि अल्कोहल, उशिरापर्यंत मोबाइल किंवा टीवी पाहणे, झोपण्यापूर्वी जेवण करणे, झोपण्याची अनियमित वेळ, जास्त औषधांचे सेवन, शारीरिक दुखणे इतर. यांसारख्या समस्यांमुळे जर झोप येत नसेल तर हे पाच उपाय नक्की अवलंबवा. 
 
नियमित चांगली झोप येण्याकरिता उपाय- 
1. जेवणात बदल  करून उत्तम जेवण करावे. रात्रीचे जेवण हल्केसे करावे. 
2. सकाळी आणि संध्याकाळी फिरावे. कमीतकमी 2500 स्टेप. 
3. नियमित रिकाम्यापोटी सूर्यनमस्कार घालावे. कमीतकमी 12 वेळा .
4. झोपण्यापूर्वी अनुलोम-विलोम प्राणायाम करा. कमीतकमी 5 मिनट. 
5. योग निद्रा मध्ये झोपा किंवा चांगल्या गादीवर झोपा. झोपतांना श्वासावर लक्ष केंद्रित करा कसा आत येतो आणि कसा बाहेर जात आहे. नियमित हे उपाय केल्यास चांगली झोप येण्यास सुरवात होईल. 
 
झोपेसंबंधित काही टिप्स- 
1. दक्षिण दिशेला पाय करून झोपू नये. 
2. मांसाहारी पदार्थ न सेवन करता हल्केसे जेवण करावे.
3. दुपारी झोपू नये. 
4. कुठल्याही प्रकारची नशा किंवा औषध घेऊ नये. 
5. झोपण्यापूर्वी आपल्या मनातील चिंता काढून टाका कारण जेवढे महत्वपूर्ण जेवण, पाणी, श्वास घेणे आहे. त्यापेक्षा जास्त महत्वपूर्ण झोप असते. 
6. रात्री उशिरा झोपणे आणि सकाळी उशिरा उठणे बंद करा, करा झोपेची वेळ बदलली तर झोप कमी होते. 
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्यमाहितीवर आधारित आहे. या माहितीची पूर्णता,विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
 
Edited By- Dhanashri Naik