Festival Posters
✕

Best Time to Drink Coffee कॉफी पिण्यासाठी ही वेळ आरोग्यासाठी हानिकारक, योग्य वेळ आणि प्रमाण जाणून घ्या

Updated: गुरूवार, 14 जुलै 2022 (13:33 IST)
 
सकाळी उठल्यानंतर कॉफी पिणे नुकसान करु शकतं 
बरेच लोक सकाळी उठल्याबरोबर कॉफी पिण्यास सुरवात करतात, परंतु असा विश्वास आहे की कॉफी उठल्यानंतर तीन तासांनी प्यावी. यामागचे कारण असे आहे की सकाळी स्ट्रेस हॉरमोन कॉर्टिसॉलचं प्रमाण जास्त असतं. हा हॉरमोन आपली अलर्टनेस आणि फोकस वाढवण्यास मदत करतं. आणि रक्तदाब आणि चयापचय प्रतिरक्षा प्रतिसादापासून प्रत्येक गोष्ट नियंत्रित करतं. सकाळी उठल्याबरोबर कॉफी प्यायल्यास कॉर्टिसॉलची पातळी गडबडून जाते. जे तुमच्या आरोग्यास हानी पोहोचवू शकतं. दिवस जसजसा वाढत जातो तसतसे कोर्टिसॉलची पातळी हळूहळू कमी होते, नंतर आपण कॉफी पिऊ शकता. तथापि, या गोष्टीला पाठिंबा देण्यासाठी अभ्यासाची आवश्यकता आहे. तरीही, सुरक्षिततेसाठी, आपण थोड्या वेळा थांबून कॉफी प्याल्यास आरोग्यासाठी योग्य ठरेल.
 
कॉफीचे व्यसन होऊ शकतं
कॅफिनचे अनेक फायदे असतात परंतु काही रिपोर्ट्सप्रमाणे कॅफिनची व्यसनाप्रमाणे सवय पडते. कॅफिन कोकेनसारखे कार्य करणारी मेंदूची काही रसायने सोडतात असे मानले जाते. कॉफीच्या बियांत असणारे उत्तेजक द्रव्य ड्रग्ससारखे व्यसन देत नसले तरी जास्त कॉफी प्यायल्याने आपण मानसिक किंवा शारिरीक त्यावर अवलंबून राहू शकता. उदाहरणार्थ, कॉफीशिवाय तुम्हाला सुस्त किंवा डोकेदुखी वाटू शकते.
 
या लोकांनी कॉफी पिऊ नये
काही अहवालानुसार, रिकाम्या पोटी कॉफी प्यायल्याने पोटातील लाइनिंगला नुकसान होतं. म्हणून काहीतरी खाल्ल्यानंतरच कॉफी प्या. अगदी सामान्य लोकांसाठी, एका दिवसात 4 कपपेक्षा जास्त कॉफी हानी पोहोचवू शकते. दुसरीकडे, आपल्याला एंग्जाइटी डिसऑर्डर, बाईपोलर डिसऑर्डर, हार्ट प्रॉब्लम किंवा अतिसार सारख्या समस्या असल्यास कॉफी टाळा. त्याच वेळी, गरोदरपणात 2 किंवा तीन कपपेक्षा जास्त कॉफी पिऊ नका.

सर्व पहा

Pitru Paksha 2026: पूर्वजांप्रती कृतज्ञता व त्यांना तृप्त करण्यासाठी पितृपक्षात श्राद्धातील प्रसादाची थाळी

Pitru Paksha 2026: पितृपक्षात या ३ वस्तू घरी आणा; पितर प्रसन्न होतील

Garud Puran स्त्रिया 'श्राद्ध', 'तर्पण' किंवा 'पिंडदान' करू शकतात का? गरुड पुराणातील माहिती जाणून घ्या

पितृपक्षात जुळून येणार 'लक्ष्मी-नारायण राजयोग'; ४ राशींवर होणार धनवर्षाव

Pitru Paksha 2026 पितृ पक्ष कधीपासून सुरू? श्राद्ध तारखांचे संपूर्ण वेळापत्रक

सर्व पहा

नवरात्रीच्या गरब्यात मेकअप राहावा रात्रभर फ्रेश; या वॉटरप्रूफ मेकअप टिप्स नक्की फॉलो करा

शरीरातील साखरेची पातळी कमी झाल्यास काय होते? ‘ही’ लक्षणे दिसल्यास वेळीच ओळखा

शरीर सडपातळ आणि फिट ठेवण्यासाठी या ५ योगा टिप्स अवलंबवा

जातक कथा : दुष्काळ आणि कासवाची गोष्ट

नेहमीच्या इडलीपेक्षा वेगळा असा प्रकार ''मसाला स्टफ्ड इडली'' Tiffin recipe

पुढील लेख