शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By
Last Modified: शनिवार, 15 मे 2021 (16:42 IST)

घरीच राहून कोरोनाला लढा कसे द्याल जाणून घ्या

कोरोनाव्हायरस ची भीती सध्या लोकांमध्ये दिसून येत आहे. सामान्य सर्दी -पडसं झाले की त्याला देखील लोक कोरोनाशी निगडित बघत आहे.अशा परिस्थितीत लोक घरातच वेळ घालवत आहे. या कठीण वेळेवर मात करण्यासाठी सकारात्मक विचारसरणी असणं आवश्यक आहे. घरातच राहून आपण या विषाणूला टाळू शकता.या साठी आपल्याला काही गोष्टींची काळजी घेणं महत्त्वाचे आहे. चला तर मग जाणून घेऊ या. 
 
* जरी आपण घरात आहात तरी आपण स्वच्छतेच्या नियमांचे अनुसरण करा. 
 
* जर एखादी नवीन व्यक्ती घरात येत असेल तर मास्क  वापरा आणि सामाजिक अंतराचे अनुसरण करा.
 
* आपले वेळापत्रक बनवा जेणे करून आपले मन शांत राहील आणि कोणत्याही निरुपयोगी गोष्टी आपल्यावर वर्चस्व गाजवू नये. 
 
* घरात असल्याच्या अर्थ असा नाही की आपण सोशल मीडियाच्या आहारी जावे. या मुळे आपले तणाव अधिक वाढू शकतं.आपण सोशल मीडियावर नेहमी नकारात्मक गोष्टी ऐकत किंवा वाचत राहिल्यास हे तणावचे कारण बनू शकते, म्हणून त्यांच्यापासून अंतर ठेवा.
 
* कुटुंबातील सदस्यांसह आपला वेळ घालवा. काही सर्जनशील कार्य करा. आपण गेम खेळा किंवा काही चांगली पुस्तके वाचा. किंवा चांगले संगीत ऐका. तसेच मुलांसमवेत वेळ घालवा.
 
* उपासनेमध्ये स्वतःचे मन लावा आणि धार्मिक पुस्तके आणि साहित्य वाचा.
 
* वेळ कशी ही असो सरून जाते. जरी सध्या  वेळ वाईट आहे ही वेळ देखील निघून जाईल.आपले वेळा पत्रक बनवा. आपल्याला व्यायाम कधी करायचा आहे ? रात्रीचे जेवण कधी घ्यायचे आहे ? या गोष्टींना लक्षात ठेवून योग्य वेळापत्रक बनवा.
 
* आपल्या आहारात पौष्टिक गोष्टींचा समावेश करा. अशा गोष्टी आहारात समाविष्ट करा, ज्यामुळे रोग प्रतिकारशक्ती वाढेल.