मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By
Last Modified: शनिवार, 3 एप्रिल 2021 (16:40 IST)

आपण डोळ्यात लेन्स वापरता ,अशी काळजी घ्या

आपण डोळ्यात लेन्स लावून अंघोळ करत असाल तर असं करणे टाळा.असं केल्याने डोळ्यात संसर्ग होण्याचा धोका 7 पटीने जास्त असतो. डोळ्यात लालसरपणा आणि वेदने सह कॉर्निया मध्ये अल्सर देखील होऊ शकतो. 
तज्ज्ञ सांगतात की कॉन्टॅक्ट लेन्स घालणाऱ्यांनी अंघोळ करताना लेन्स चा वापर केला असल्यास डोळ्यात त्रास जाणवू शकतो. तसेच डोळ्याने अंधुक दिसण्याचा त्रास देखील होऊ शकतो.  याचे कारण असे की अंघोळ करतांना बेक्टेरिया डोळ्यात संसर्ग पसरवतात. अंघोळ करताना लेन्समध्ये  ओलावा असतो या मुळे बेक्टेरिया वेगाने संसर्ग पसरवतात. 
* लेन्स घालून झोपणे देखील चांगले नाही. या मुळे बेक्टेरिया आणि फंगल संसर्ग होण्याचा धोका 3 पटीने वाढतो. विज्ञानाच्या भाषेत याला मायक्रोबियल किरेटायटिस म्हणतात.
 
* लेन्सची स्वच्छता करणे देखील महत्त्वाचे आहे. लेन्स अस्वच्छ असल्यास डोळ्याच्या संसर्गाचे प्रकरण वाढतात. जे पुढे जाऊन डोळ्याची दृष्टी कमी करू शकतात. म्हणून लेन्सचा वापर करताना काळजी घेणं महत्त्वाचे आहे. तसेच लेन्सचा वापर करताना सावधगिरी बाळगावी.