शनिवार, 4 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By

पिझ्झा पेक्षा अधिक धोकादायक त्याच्या बॉक्स

घरी जेवण्याचा मूड नसला, सुट्टी असली किंवा मुलांनी हठ्ठ केला की आपण लगेच पिझ्झा ऑर्डर करतो. आणि अर्ध्या तासात घरी येणारा पिझ्झा खूप चव घेऊन खातो परंतू जंक फूड म्हणून पिझ्झा धोकादायक असला तरी त्याहून धोकादायक पिझ्झा बॉक्स आहे हे जाणून आश्चर्य वाटत असलं तरी हे विचार करण्यासारखे आहे.
 
पिझ्झा बॉक्स कागदाने तयार केलेला असतो हा विचार करून त्याने आरोग्यावर काही दुष्परिणाम होऊ शकत नाही अशी आमची समजूत असते. परंतू काय आपल्याला माहीत आहे की हा बॉक्स अनेक प्रकाराच्या मटेरिअल आणि केमिकलने तयार केलेला असतो. धोकादायक रिसाइकल्ड मटेरिअल ने तयार केलेल्या या बॉक्समध्ये गोंद, हाइज आणि विषारी शाई होण्याची शक्यता नाकारता येत नाही कारण पिझ्झा गरम राहावा म्हणून वापरलं जातं आणि गरम पिझ्झ्यासोबत हे केमिकलही आमच्या पोटात जातात. 
 
पिझ्झा बॉक्समध्ये ऑइल, चीज किंवा फॅट्स शोषले जाऊ नाही म्हणून एका प्रकाराची कोटिंग केली जाते. या कोटिंगमुळे ही कर्करोग होण्याची शक्यता असते. यात डीआयबीपी अर्थात डायिसोबायटील फेथलेट नावाचे केमिकल आढळतं ज्याने प्रजनन विकासावर विपरित परिणाम टाकतं. हे शरीरात एन्डोक्रायनाइनला नुकसान पोहचवतं. विशेषज्ञांप्रमाणे या बॉक्स तयार करताना वापरण्यात येणार्‍या वस्तूंमध्ये परफ्लूरोकाइलिल एथिल आढळतं जे शरीरात अनेक वर्ष राहतं आणि यामुळे कर्करोग साखरे आजार होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
 
गरम पिझ्झा खाण्याचा शौक आम्हालाच महागात पडू शकतो कारण अधिक वेळ पिझ्झा गरम राहावा यासाठी डिलेव्हरीपूर्वी त्याला 60 ते 65 डिग्री सेल्सिअस तापमानापर्यंत गरम केलं जातं. गरम पॅकेजिंगमुळे यात केमिकल मिसळतात आणि पिझ्झा विषारी होऊन जातं.