Marathi Biodata Maker
✕

उन्हाळा आला, सातूचे 10 मौल्यवान फायदे जाणून घ्या

Updated: मंगळवार, 19 मे 2020 (21:41 IST)
 
1 उन्हाळ्यात सातूचे सेवन केल्याने आपण उष्माघात आणि उष्णतेपासून वाचू शकता. सातूच्या सेवनामुळे उष्माघात होण्याची शक्यता कमी होते आणि शरीरात थंडावा जाणवतो.
 
2 आपल्याला पुन्हा पुन्हा भूक लागत असल्यास किंवा भूक सहन होत नसल्यास सातू आपल्यासाठी फायदेशीर आहे. हे खाऊन किंवा याचा सरबताचे सेवन केल्यावर आपल्याला भुकेचा त्रास जाणवणार नाही.
 
3 सातू हा प्रथिनांचा स्रोत आहे. पोटाच्या सर्व त्रासाला दूर करून पोटदुखीला बरे करतो. सातू खाल्ल्याने यकृत बळकट होतो. ऍसिडिटीच त्रास दूर होतो. सहज पचन झाल्यामुळे बद्धकोष्ठतेचा त्रास होत नाही.
 
4 जव आणि हरभऱ्यापासून बनवलेले हे सातू मधुमेहासाठी फायदेशीर असतं. आपण मधुमेहाचे रुग्ण असल्यास दररोज सातूचे सेवन केल्याने फायदा होईल. सातू पाण्यात घोळून सरबत बनवून घ्यावे किंवा मीठ घालून देखील घेऊ शकता.
 
5 शरीरात थकवा जाणवल्यास सातू खाल्ल्याने ऊर्जा मिळते. अशक्तपणा दूर करून आपल्याला उत्साही ठेवण्यास प्रभावी आहे. यामध्ये बरेच पौषक घटक आढळतात जे आपल्याला पोषण देतात.
 
6 अंगाची जळजळ कमी करतं. पाण्यात घोळून प्यायल्याने शरीरामधील पाण्याची कमतरता दूर होते. तहान पण शमते.
 
7 सातूच्या सेवनाने गळ्याचे आजार, ओकार्‍या, डोळ्यांचे आजार आणि इतर आजार बरे होतात.
 
8 ह्यात असलेले प्रथिनं स्नायूंना बळकट करतात.
 
9 लठ्ठपणाने त्रासलेल्या लोकांसाठी सातू हा रामबाण उपाय आहे. जव पासून बनवलेले सातू दररोज खाल्ल्याने पचनसंस्था सुरळीत काम करते. लठ्ठपणा कमी होऊन सडपातळ अंगकाठी मिळवू शकता.
 
10 रक्तदाब असलेल्या रुग्णांसाठी सातू खाणे फायदेशीर असतं. या साठी सातूमध्ये लिंबू, मीठ, जिरं आणि पाणी मिसळून प्यावं.

सर्व पहा

Ganesh Chaturthi 2026 Sthapana Shubh Muhurat: १४ सप्टेंबर रोजी गणपती स्थापना शुभ मुहूर्त

देवांना अत्यंत प्रिय असणाऱ्या या फुलांच्या माळा अर्पण करा; मिळवा विशेष आशीर्वाद!

गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी ३ प्रकारच्या चॉकलेट मोदकांची रेसिपी

कॅल्शियमची कमतरता दूर करण्यासाठी रोजच्या आहारात हे पदार्थ खा; हाडे आणि दात राहतील मजबूत!

खाऊन योग करणे योग्य आहे की अयोग्य, जेवणानंतर योगा करण्याचे परिणाम जाणून घ्या

सर्व पहा

नैतिक कथा : गोष्ट चेटकीण आणि गुलाब फुलाची

गणपती बाप्पा आणि गौरीच्या प्रसादासाठी पौष्टिक ड्रायफ्रूट्स खजूर रोल पाककृती

सततचा खोकला हे फुफ्फुसाच्या कर्करोगाचे लक्षण आहे का? जाणून घ्या कर्करोगतज्ज्ञांचा महत्त्वाचा सल्ला

श्री गणेशाच्या नैवेद्यासाठी केशरी खव्याचे लाडू, गणपती उत्सवामध्ये नक्की ट्राय करा

या पानांचे पाणी आरोग्यासाठी फायदेशीर? उकळून पिण्यापूर्वी जाणून घ्या संभाव्य फायदे

पुढील लेख
Show comments