Marathi Biodata Maker
✕

मुळांच्या या भाज्या व्हिटॅमिन आणि अँटीऑक्सिडंटने समृद्ध आहे ,फायदे जाणून घ्या

Updated: रविवार, 29 मे 2022 (15:56 IST)
 
 हिरव्या पालेभाज्यांसह मुळाच्या भाज्यांचे सेवन करणे देखील खूप फायदेशीर असल्याचे म्हटले आहे. त्यांचा आहारात समावेश केल्यास अनेक गंभीर आजारांचा धोका कमी होण्यास मदत होऊ शकते, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
 
मुळांच्या भाज्यांमध्ये भरपूर फायबर आणि अँटिऑक्सिडंट असतात तसेच कॅलरी, फॅट आणि कोलेस्ट्रॉल कमी असतात. मुळांच्या भाज्या कॅरोटीनॉइड्सचा उत्कृष्ट स्त्रोत मानला जातो, नैसर्गिकरीत्या रंगद्रव्येमुळे विशिष्ट प्रकारच्या कर्करोगाचा धोका कमी होतो. डोळे, हृदय आणि रक्तवाहिन्या निरोगी ठेवण्यासाठी मुळांच्या या भाज्यांचे सेवन करणे फायदेशीर ठरू शकते. शरीराला तंदुरुस्त आणि निरोगी ठेवण्यासाठी पुरेशा प्रमाणात पोटॅशियम, फोलेट, कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट, जीवनसत्त्वे ए, बी, आणि सी सोबत मॅंगनीजची दररोज गरज असते. या भाज्यांमुळे ती कमतरता दूर करता येते . चला या भाज्यांचे आरोग्यदायी फायदे जाणून घेऊया.
 
1 गाजर - ही सर्वात फायदेशीर मूळ भाज्यांपैकी एक मानली जाते, ती सहज उपलब्ध असते आणि शरीरासाठी अनेक प्रकारे फायदेशीर ठरू शकते. गाजरात बीटा कॅरोटीन असते ज्यामुळे ते खूप फायदेशीर ठरते. शरीराच्या आत, बीटा कॅरोटीन व्हिटॅमिन ए मध्ये रूपांतरित होते. तुमचे डोळे निरोगी ठेवण्यासोबतच रोगप्रतिकारक शक्ती मजबूत ठेवण्यासाठी व्हिटॅमिन ए देखील आवश्यक आहे.
 
2 बीटरूट - शरीरात लोहाची कमतरता असो किंवा रक्तदाबाची समस्या असो, बीटरूट खाणे तुमच्यासाठी विशेषतः फायदेशीर ठरू शकते . बीटरूटमध्ये बिटाईन नावाचे अँटीऑक्सिडेंट असते, जे हृदय निरोगी ठेवण्यास आणि अनेक प्रकारच्या गंभीर आजारांचा धोका कमी करण्यास मदत करते. बीटरूटमध्ये नायट्रेट्स देखील असतात जे चांगले रक्त परिसंचरण आणि रक्तदाब कमी करण्यास मदत करतात. 
 
3 बटाटा-  बटाटा ही सर्वात लोकप्रिय मूळ भाज्यांपैकी एक आहे. एक मध्यम आकाराचा शिजवलेला बटाटा 935 मिलीग्राम पोटॅशियम देऊ शकतो. हे केळीमध्ये आढळणाऱ्या पोटॅशियमच्या दुप्पट आहे. बटाटे हे व्हिटॅमिन-सी आणि बी 6 चा देखील चांगला स्रोत आहे, याचे सेवन केल्याने तुम्हाला अनेक आरोग्य फायदे मिळू शकतात. बटाट्यामध्ये अँटिऑक्सिडंट्स देखील आढळतात, जे अनेक रोगांचा धोका कमी करण्यास मदत करतात.
 

सर्व पहा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

सर्व पहा

तुमच्या व्यक्तिमत्त्वाला अधिक आकर्षक बनवणारे ७ महत्त्वाचे छंद जाणून घ्या

सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांसाठी सुवर्णसंधी: 'या' शासकीय पोर्टलवर नोंदणी करून घरबसल्या मिळवा रोजगार

तुम्हाला पैसे वाया घालवायचे नसतील तर मोसंबी खरेदी करताना या गोष्टी लक्षात ठेवा

Shree Balasaheb Thackeray Smrutidin 2026 Vinmra Abhivadan हिंदुहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन संदेश

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे प्रभावी व्यक्तिमत्त्व निबंध

पुढील लेख
Show comments