PMJDY Aadhaar Link:जन धन खाते आणि आधार कार्ड लवकरात लवकर लिंक करा फायदे जाणून घ्या

Last Modified शनिवार, 30 एप्रिल 2022 (13:21 IST)
पंतप्रधान मोदी यांनी सन 2014 मध्ये प्रधानमंत्री जन धन योजना सुरू केली. या योजनेच्या माध्यमातून सरकारने देशातील प्रत्येक वर्गाला बँकिंग व्यवस्थेशी जोडण्याचा प्रयत्न केला आहे. पूर्वी देशातील एक मोठा वर्ग होता जो बँकिंग व्यवस्थेशी जोडलेला नव्हता, परंतु, या योजनेच्या सुरुवातीपासून, आता जवळपास प्रत्येक देशवासीयांचे बँक खाते आहे. जन धन खाते हे एक शून्य बेलेंस खाते आहे ज्यामध्ये सरकार विविध योजनांचे लाभ थेट खात्यातील लोकांना हस्तांतरित करते. सध्या देशात एकूण

44.23 कोटी बँक खातं उघडण्यात आलं आहे. या पैकी
44.23 कोटी खात्यांपैकी 33.9 कोटी खाती सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये उघडण्यात आली आहेत. त्यातर ग्रामीण बँकांमध्ये 8.05 खाती आणि खाजगी बँकांमध्ये 1.28 खाती उघडण्यात आली आहेत. या खात्यात, थेट लाभ हस्तांतरणाव्यतिरिक्त, सरकार लोकांना डेबिट कार्ड सुविधा देखील प्रदान करते. जनधन खाती आधार कार्डशी लिंक करणे खूप महत्त्वाचे आहे. तसे न केल्यास लाखो रुपयांचे नुकसान होऊ शकते. चला तर मग जाणून घेऊया आधार कार्ड आणि जन धन खाते लिंक करणे का आवश्यक आहे आणि दोन्ही लिंक करण्याची प्रक्रिया काय आहे-
आधार कार्ड आणि जन धन खाते लिंक करण्याची प्रक्रिया
*
दोन्ही लिंक करण्यासाठी, प्रथम ज्या बँकेत तुम्हाला खाते लिंक करायचे आहे तेथे जा.
* बँकेत जाताना आधार कार्डाची छायाप्रतही सोबत घ्यावी.
* येथे तुम्हाला दोन्ही लिंक करण्यासाठी एक फॉर्म भरावा लागेल.
* यानंतर बँक तुमचे आधार कार्ड आणि जन धन खाते लिंक करेल.
* याशिवाय तुम्ही मोबाईल एसएमएसद्वारेही लिंक करू शकता.
* यासाठी तुमच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावरून एसएमएस पाठवा.
या साठी UID <SPACE>आधार नंबर <SPACE>अकाउंट नंबर
लिहून 567676 नंबरवर पाठवा. आपला आधार आणि जनधन अकाउंट लिंक होईल.
* या शिवाय आपण बँक एटीएम वरून देखील लिंक करू शकता.

फायदे-
जन धन खात्यामध्ये खातेधारकाला रुपे डेबिट कार्डची सुविधा देखील मिळते. या कार्डमध्ये 1 लाखाचा अपघात विमा कवच उपलब्ध आहे. परंतु, खातेधारकाच्या नॉमिनीने जर त्याचे खाते आधार कार्डशी लिंक केले असेल तरच त्याला या विमा संरक्षणाचा लाभ घेता येईल. डेबिट कार्ड व्यतिरिक्त, खातेदाराला 30 हजार रुपयांच्या अपघाती मृत्यू विम्याचा स्वतंत्रपणे लाभ देखील मिळतो. अशा परिस्थितीत जमधन खाते लवकरात लवकर आधार कार्डशी लिंक करा.यावर अधिक वाचा :

हुपरीत आढळली एलियन्ससारखी दिसणारी अळी

हुपरीत आढळली एलियन्ससारखी दिसणारी अळी
निसर्ग आपल्या अचंबित करणार्‍या आविष्कारांनी मानवाला नेहमीच विचार करावयास लावतो. संपूर्ण ...

Video विमानाखाली कार घुसली, IGI विमानतळावर मोठा अपघात टळला

Video विमानाखाली कार घुसली, IGI विमानतळावर मोठा अपघात टळला
नवी दिल्ली- राष्ट्रीय राजधानी दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर मंगळवारी ...

पनवेलमध्ये मनसेला खिंडार, 100 पदाधिकाऱ्याचा शिंदे गटात ...

पनवेलमध्ये मनसेला खिंडार, 100 पदाधिकाऱ्याचा शिंदे गटात प्रवेश
शिवसेनेनंतर शिंदे गटाने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मनसेला खिंडार पाडले आहे. शिंदे ...

संजय राऊत यांच्या मुंबईतील दोन ठिकाणी छापे

संजय राऊत यांच्या मुंबईतील दोन ठिकाणी छापे
शिवसेना खासदार संजय राऊत यांना सक्तवसुली संचालनालयाने अटक केल्यानंतर त्यांच्या संबंधित ...

सुप्रिया सुळे म्हणतात आम्ही सर्व कुटुंब या लढ्यामध्ये एकत्र ...

सुप्रिया सुळे म्हणतात आम्ही सर्व कुटुंब या लढ्यामध्ये एकत्र आहोत
शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते तथा खासदार संजय राऊत यांना ईडीने अटक केली. राष्ट्रवादी पक्षाचे ...

जम्मू-काश्मीर प्रचार समितीचे अध्यक्ष बनल्यानंतर काही ...

जम्मू-काश्मीर प्रचार समितीचे अध्यक्ष बनल्यानंतर काही तासांतच गुलाम नबी आझाद यांचा राजीनामा
काँग्रेसने जम्मू-काश्मीर संघटनेत मोठे बदल करून गुलाम नबी आझाद यांच्यावर मोठी जबाबदारी ...

कोरोना दिल्लीत परतला! दररोज 8 ते 10 मृत्यू, रूग्णालयात ...

कोरोना दिल्लीत परतला! दररोज 8 ते 10 मृत्यू, रूग्णालयात रुग्णांची संख्या वाढत आहे
देशाची राजधानी दिल्लीत कोरोनाच्या वाढत्या रुग्णांमुळे पुन्हा चिंतेचे वातावरण निर्माण झाले ...

लता दीदीच्या जयंती दिनी आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालय ...

लता दीदीच्या जयंती दिनी आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालय सुरू करा
भारतरत्न दिवंगत लता मंगेशकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ सुरू करण्यात येणारे आंतरराष्ट्रीय ...

शिवसेनेच्या ५५ आमदारांना उद्धव ठाकरे यांच्याकडून व्हिप

शिवसेनेच्या ५५ आमदारांना उद्धव ठाकरे यांच्याकडून  व्हिप जारी
पावसाळी अधिवेशनाच्या आधी शिवसेनेने शिंदे गटाला धक्का दिला आहे. विधानसभेतील शिवसेनेच्या ५५ ...

मोठी कामगिरी : तब्बल एक हजार कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त

मोठी कामगिरी :  तब्बल एक हजार कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त
मुंबई पोलिसांच्या अंमलीपदार्थविरोधी पथकाने गुजरातच्या भरुचमध्ये धडक कारवाई करत, तब्बल एक ...