Dharma Sangrah
✕

कमी वेळात मेंदूला आराम देण्यासाठी उपाय

Updated: बुधवार, 2 डिसेंबर 2020 (10:14 IST)
असे म्हणतात की ज्यावेळी एखादा व्यक्ती तणावात असतो तो चहा अधिक पितो. आपण बऱ्याच लोकांना बघितले असणार.

ऑफिसात कामाचे ताण वाढल्यास लोक चहा पितात, आपण दुधाचा चहा न पिता हर्बल चहा वापरावा. हर्बल चहा प्यायल्याने या मधील घटक आपल्या शरीरातील विषारी पदार्थांना दूर करतात आणि आपल्या मेंदूला आराम देतात. जर आपण चहा पीत नसाल तर आपण च्युईंगगम वापरा. या मुळे आपल्या कॉर्टिसॉल हार्मोनची पातळी कमी होणार. तथापि, हे जास्तकाळ चावू नये काही मिनिटानंतर काढून फेकून द्यावे आणि तोंडाला आराम द्यावा.
 
* स्ट्रेचिंग करणे आणि मालिश करणे - 
जर आपले मेंदू तणावात आहे, तर मालिश केल्याने आपल्याला त्वरितच आराम मिळू शकतो. अशा प्रकारे स्ट्रेचिंग देखील आपल्याला मदत करू शकेल.स्ट्रेचिंग आपण खुर्चीवर बसून किंवा पलंगावर बसून देखील करू शकता. या मुळे आपल्या स्नायूंना फार आराम मिळतो.
 
* योगा - 
आजच्या काळात योगा भारतातच नव्हे तर जगभरात शरीर आणि मनाला शांत ठेवण्यासाठी उपयुक्त ठरत आहे. सध्या तर बऱ्याच कंपन्या कॉर्पोरेट योगासाठी खास प्रशिक्षक देखील हायर करत आहे.
या साठी आपण सकाळ संध्याकाळचं योगा करावं असे आवश्यक नाही. आपणास मेंदूला त्वरितच आराम द्यायचे असल्यास योगा करायला पाहिजे. या मध्ये ध्यान, प्राणायाम इत्यादी पद्धतींचा समावेश करू शकता.
 
* उन्हात फिरणे - 
आपल्याला एखाद्या वातावरणाचे ताण येत असल्यास, तर पाच ते दहा मिनिटाचे वॉक घ्या. हे आपण एकटेच करावे, ते आपल्यासाठी योग्य असणार. ऊन देखील या साठी आपल्याला मदत करते आणि आपले मेंदू शांत ठेवते.

* ज्यूस पिणे किंवा डार्क चॉकलेट खाणे -
ज्यूस प्यायल्याने आपल्या मेंदूच्या लहरींना आराम मिळतो. विशेषतः आंबट फळांचे जसे की मोसंबी,संत्री,अननस या फळांचे सेवन करावे,या मुळे आपल्या मेंदूला त्वरितच आराम मिळतो. तसेच डार्क चॉकलेट खाल्ल्याने  तणाव असलेल्या मेंदूमध्ये कॉर्टिसॉलची पातळी कमी होते.
 
* आवडीचे संगीत -
आपल्या गाण्यांच्या अमर्यादित यादीं मधून आपल्यासाठी काही निवडक गाणी निवडा, ज्यांच्या मुळे आपल्याला चांगले वाटेल. तणावाच्या काळात काही निवांत क्षण आपल्याला शांती आणि आराम देतात. काही काळ डोळे मिटून गाणी ऐकल्याने आपले ताण दूर होतात. खरे सांगायचे तर आपल्या मेंदूनेच आपले शरीर आणि इतर व्यवहार नियंत्रित होतात, म्हणून आपल्या मनावर आणि मेंदूवर जास्त ताण देणे टाळावे आणि वरील उपाय करून मेंदूला आराम द्यावा.

सर्व पहा

Ganesh Chaturthi 2026 Sthapana Shubh Muhurat: १४ सप्टेंबर रोजी गणपती स्थापना शुभ मुहूर्त

देवांना अत्यंत प्रिय असणाऱ्या या फुलांच्या माळा अर्पण करा; मिळवा विशेष आशीर्वाद!

गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी ३ प्रकारच्या चॉकलेट मोदकांची रेसिपी

कॅल्शियमची कमतरता दूर करण्यासाठी रोजच्या आहारात हे पदार्थ खा; हाडे आणि दात राहतील मजबूत!

खाऊन योग करणे योग्य आहे की अयोग्य, जेवणानंतर योगा करण्याचे परिणाम जाणून घ्या

सर्व पहा

नैतिक कथा : गोष्ट चेटकीण आणि गुलाब फुलाची

गणपती बाप्पा आणि गौरीच्या प्रसादासाठी पौष्टिक ड्रायफ्रूट्स खजूर रोल पाककृती

सततचा खोकला हे फुफ्फुसाच्या कर्करोगाचे लक्षण आहे का? जाणून घ्या कर्करोगतज्ज्ञांचा महत्त्वाचा सल्ला

श्री गणेशाच्या नैवेद्यासाठी केशरी खव्याचे लाडू, गणपती उत्सवामध्ये नक्की ट्राय करा

या पानांचे पाणी आरोग्यासाठी फायदेशीर? उकळून पिण्यापूर्वी जाणून घ्या संभाव्य फायदे

पुढील लेख
Show comments