शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By
Last Modified: शुक्रवार, 2 ऑक्टोबर 2020 (09:48 IST)

डोळ्यांना विश्रांती देणारे काही सोपे व्यायाम

सध्या बहुतेक लोकं वर्क फ्रॉम होम म्हणजेच घरातूनच काम करत आहे. सतत कॉम्प्युटर स्क्रीन आणि लॅपटॉपच्या समोर बसून राहून डोळ्यात जडपणा आणि जळजळ होऊ लागते, तसेच डोळ्यातून पाणी देखील येतं. बऱ्याच वेळा कॉम्प्युटर स्क्रीन समोर बसून काम केल्यानं किंवा जास्त काळ मोबाईल हाताळल्यानं या सर्व समस्यांना सामोरी जावं लागतं. पण या साऱ्या समस्यांपासून सुटका मिळविण्यासाठी डोळ्यांना विश्रांतीची गरज असते. आणि असेच काही सोपे व्यायाम करून आपण आपल्या डोळ्यांच्या या त्रासापासून सुटका मिळवू शकतो. 
 
या साठी आम्ही डॉ.चंद्रशेखर विश्वकर्मा यांच्याशी बोललो, हे फिजियोथेरेपिस्ट आणि योग प्रशिक्षक आहे चला तर मग जाणून घेऊया तज्ज्ञांचा सल्ला.
 
डोळ्यांवर तळ हात ठेवा - 
कोणत्याही सुखसनाच्या आसनेवर स्वेच्छेने बसा. तळहात एकत्ररीत्या चोळा जेणे करून उष्णता जाणवेल. आता डोळे बंद करा आणि तळहात डोळ्यांवर ठेवा. डोळ्यांना उष्णता जाणवेल. तळहात थंड झाल्यावर ही क्रिया पुन्हा करा. अश्या प्रकारे हातातून निघणारी ही शक्ती आपल्याला जाणवेल. असे आपल्याला किमान 3 वेळा करायचे आहे.
 
उजवी कडे डावी कडे बघणं - 
समोर पाय लांब करून बसा. दोन्ही हात खांद्याच्या समोर पसरवा. मूठ बंद करा, अंगठा वरील बाजूस करा. डोक्याला स्थिर करा. आता डोळ्यांनी आधी डावा अंगठा बघा, नंतर दृष्टीला नाकाच्या मध्य भागी आणा. या नंतर उजव्या हाताच्या अंगठ्यावर दृष्टी लावा नंतर नाकाच्या मध्यभागी आणा. ही क्रिया किमान 10 ते 15 वेळा आवश्यकतेनुसार करा आणि डोळ्यांना काही काळ विश्रांती द्या.
 
समोर आणि उजवी-डावी कडे बघा - 
आरामशीर बसा. आता खांद्यांच्या समांतर डाव्या हाताला डोळ्यांचा समोर आणि उजव्या हाताला उजवी कडे घेऊन जा. खांद्याच्या उंचीच्या बरोबर अंगठा बाहेर काढून मूठ बंद करून स्थिर ठेवा. आता डोकं न हालवता समोरच्या अंगठ्याला बघा नंतर उजव्या अंगठ्याला बघा. अश्या प्रकारे 10 ते 15 वेळा बघा. आणि हातांच्या स्थितीला बदलून डाव्या हाताला डावी कडे आणि उजव्या हाताला पुढील बाजूस करा आणि डोळ्यांना विश्रांती द्या.  
 
दृष्टीला जवळ लांब करा - 
आरामशीर बसा. उजवा हात खांद्याच्या सरळ उचलून समोरच्या बाजूने ओढून धरा. मूठ बंद करा, अंगठा बाहेर बाजूस वर ठेवा. नजर अंगठ्यावर स्थिर करा हळुवारपणे अंगठा जवळ घेत नाकाला स्पर्श करा आणि पुन्हा लांब नेत हाताला ताणून धरा. परत अंगठ्याला नाकाच्या जवळ घ्या. अश्या प्रकारे ही क्रिया 5 वेळा करा.
 
त्याच बरोबर सकाळी उठल्यावर तोंड धुताना आपल्या तोंडात पाणी भरून ठेवा आणि डोळ्यांना उघडून पाण्याचे शिंतोडे मारा. असे 1, 2 वेळा करावं. नंतर तोंडातून पाणी काढून तळहाताला डोळ्यांच्या वर ठेवा.