बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By

निरोगी राहायचे असेल तर हिवाळ्यात घ्या हा आहार

हिवाळ्यात आपल्या आहार विहारच्या सवयी बदलल्यामळे वजनही वाढू शकते. तसेच या दिवसात शरीरातही अनेक बदल होतात. यामुळे आरोग्याची खूप काळजी घ्यावी लागते. यासाठी योग्य आहार फायदेशीर ठरतो. थंडीत शरीराचे तापमान टिकवून ठेवण्यासाठी शरीर जास्त ऊर्जा वापरते. यामुळे सतत भूक लागते. सतत भूक लागल्याने आपण गरजेपेक्षा जास्त खातो. म्हणूनच आहाराकडे जास्त लक्ष द्यायला हवे. तर पाहू या थंडीत कोणता आहार योग्य ठरतो ते…..
 
थंडीत मिळणारे लाल गाजर, नवलकोल अशा भाज्या पौष्टिक तर असतात. पण त्यामुळे थंडीपासून रक्षणही होते. थंडीतल्या सर्दी, खोकला, फ्लू अशा आजारांना या भाज्यांच्या सेवनाने दूर ठेवता येते.
 
ग्रीन टीचे सेवनही थंडीत उपयुक्त ठरते. कारण ग्रीन टीमध्ये भरपूर अँटी ऍक्‍सिडंट्‌स असतात. यामुळे अनेक बॅक्‍टेरियांचा प्रभाव कमी होतो. तसंच रोगप्रतिकारक शक्ती वाढायला अँटीऍक्‍सिडंट मदत करतात.
 
हिवाळ्यात लसूण खाणं चांगले. लसणामुळे शरीराला ऊर्जा मिळते तसंच रोगप्रतिकारक शक्तीही वाढते.
 
गरम दुधात मध घालून प्यायल्याने शरीरात उष्णता निर्माण होते. थंडीत दुधात सारखाऐवजी मध घालावा.
 
हिरव्या भाज्यांमधली अ आणि क ही जीवनसत्त्वं थंडीत आरोग्यासाठी लाभदायी ठरतात.
 
संत्री, द्राक्षं अशी फळांमध्ये क जीवनसत्त्वं असतं. यामुळे त्वचेचं पोषण होतं. कोलेस्टरॉल कमी करण्यासोबतच ही फळं चयापचय क्रिया ही वाढवतात.
 
या दिवसात प्रथिनयुक्त आहार घ्यावा. ब्रेड, पांढरा भात असे पदार्थ टाळावे.
 
गोड पदार्थ, शीतपेय, दुग्धजन्य पदार्थ याचं सेवनही प्रमाणातच करावं. सर्दी, खोकला असेल तर दुग्धजन्य पदार्थ टाळावेत.
 
तेलकट पदार्थ खाण्याचे टाळावे.